माजी मंत्री लक्ष्मण ढोबळेंची संस्था सील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

थकबाकी भरण्यासाठी संस्थेला यापूर्वी नोटीसा देण्यात आल्या. मात्र त्याची दखल घेण्यात न आल्याने ही कारवाई करण्यात आली. या संस्थेशिवाय 21 लाखांची थकबाकी असलेल्या करिमुन्निसा हायस्कूलच्या कार्यालयासही सील ठोकण्यात आले. लोकमंगल मल्टिस्टेटच्या कुमठे येथील मिळकतीची 43 लाखांची थकबाकी आहे.

सोलापूर : महापालिकेने आज माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या खादी ग्रामोद्योग संस्थेच्या कार्यालयास सील ठोकले. मिळकत कराच्या 45 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी ही कारवाई करण्यात आली.

थकबाकी भरण्यासाठी संस्थेला यापूर्वी नोटीसा देण्यात आल्या. मात्र त्याची दखल घेण्यात न आल्याने ही कारवाई करण्यात आली. या संस्थेशिवाय 21 लाखांची थकबाकी असलेल्या करिमुन्निसा हायस्कूलच्या कार्यालयासही सील ठोकण्यात आले. लोकमंगल मल्टिस्टेटच्या कुमठे येथील मिळकतीची 43 लाखांची थकबाकी आहे. ती वसूल करण्याबाबत आज (गुरुवारी) चर्चा होणार आहे. ती न भरल्यास त्या ठिकाणीही सील ठोकण्याची कारवाई केली जाणार असल्याचे कर संकलन अधिकाऱ्यांनी दिली.

शहर व हद्दवाढ भागातील मिळकतदारांकडे सुमारे अडीचशे कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठी महापालिकेने विशेष मोहिम सुरु केली आहे. गेल्या अकरा दिवसात आतापर्यंत दहा कोटी रुपयांची थकबाकी वसूल झाली आहे.

Web Title: Marathi news Solapur news IT department seized Laxman Dhoble organization