कोरेगावची दंगल ही राज्यातील अखेरची दंगल ठरावी : आ. भालके

हुकूम मुलाणी  
शनिवार, 3 मार्च 2018

मंगळवेढा (सोलापूर) : महाराष्ट्रात अनेक जातीय दंगली झाल्या समाजामध्ये सकारात्मक आणि बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या चोखोबा ते तुकोबा, या समता वारीमुळे भीमा कोरेगावची दंगल ही राज्यातील अखेरची दंगल ठरावी. असे मत आ. भारत भालके यांनी व्यक्त केले.                              

मंगळवेढा (सोलापूर) : महाराष्ट्रात अनेक जातीय दंगली झाल्या समाजामध्ये सकारात्मक आणि बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या चोखोबा ते तुकोबा, या समता वारीमुळे भीमा कोरेगावची दंगल ही राज्यातील अखेरची दंगल ठरावी. असे मत आ. भारत भालके यांनी व्यक्त केले.                              

वृंदावन फाऊंडेशन पुणेच्या वतीने कोरेगांव-भिमा प्रकरणानंतर तरूणांना मानवतेचा संदेश देण्यासाठी श्री संत चोखामेळा समाधी ट्रस्ट व वारी परिवार सहकार्यातून मंगळवेढा ते देहु पर्यंत काढलेल्या समता वारीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, राहूल शहा, नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, प्रवीण खवतोडे, पांडुरंग नाईकवाडी, राहूल सावंजी, मारूती वाकडे, पी.बी.पाटील, समता वारी संयोजन समितीचे डी. एस. काटे, प्रा.सुरेखा भालेराव, उपाध्यक्ष महारुद्र जाधव, वाहिद पाशा शेख, विजयसिंह जगदाळे, श्रीधर कांबळे, डॉ. खुशाल मुंडे, उस्मान अली शाह साब, गंगाधर अहिरे, सिध्दाराम पाटील, फुलचंद नागटिळक सतीश दत्तू आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. भालके म्हणाले की, चोखोबा ते तुकोबा, एक वारी समतेची या उपक्रमाच्या माध्यमातून समतेचा विचार समाजात जावा आणि ही चळवळ समाजात रुजावी. समतेने जर आपण पुढे गेलो तरच समाजाचा विकास होणार आहे. प्रा. लक्ष्मण ढोबळे, म्हणाले की, आधात्माचा विषय हा माणसांची मने जोडणारा विषय आहे. त्यामुळे या चोखोबा ते तुकोबा या वारीच्या माध्यमातून समाजातील दुभंगलेली मनं जोडली जावीत राजकारण्यांच्या नादाला लागून बिघडलेल्या समाजाला सुधारण्याचे काम तुकोबा आणि चोखोबा यांच्या शिकवणीत आहे. नगराध्यक्षा अरूणा माळी म्हणाल्या की चोखोबा ते तुकोबा या वारीच्या माध्यमातून समतेचा संदेश निश्चितपणे दिला जाणार आहे. संताच्या भुमीतून या समता वारीचे प्रस्थान होत आहे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. प्रास्ताविक समता वारीचे निमंत्रण सचिन पाटील यांनी केले.

Web Title: Marathi news solapur news koregao bhima bhalke riots