कोसम अत्याचारातील आरोपींवर कठोर कारवाई करा; संत सेना नाभिक दुकानदार संघाची मागणी

प्रमोद बोडके
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

बिदर जिल्ह्यातील कोसम गावातील तरुणीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ आणि सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आली.

सोलापूर : बिदर जिल्ह्यातील कोसम गावातील तरुणीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी श्री संत सेना नाभिक दुकानदार संघ आणि सेवाभावी संस्थेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष संतोष धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

सोलापुरातील नाभिक दुकानदारांनी सोमवारी सकाळी दहा वाजता रंगभवन येथील समाजकल्याण केंद्राजवळ उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. सोलापूर शहर व परिसरात 1 हजार 400 च्या आसपास नाभिक दुकाने आहेत. या दुकानांमधून होणारे एक दिवसाचे उत्पन्न, मजुरांचा पगार पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना देण्यात येणार असल्याचेही धोत्रे यांनी सांगितले. पीडितांच्या कुटुंबीयांना आरोपी व त्यांच्या नातेवाईकांपासून धोका असल्याने या परिवाराला तत्काळ संरक्षण देण्याचीही मागणी करण्यात आली. 

यावेळी उपाध्यक्ष सुधीर वड्डेपल्ली, कार्याध्यक्ष गोवर्धन कोडपाक, सहसचिव मोहन जमदाडे, प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत राऊत, वैभव शेटे, सुभाष शिंदे, प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते. 

Web Title: Marathi News Solapur News Kosam Incident sant sena nabhik sangh