मंगळवेढा: नगरपलिकेच्या विविध विभागातील खातेप्रमुखांसह 22 पदे रिक्त

mangalwedha
mangalwedha

मंगळवेढा : येथील नगरपलिकेच्या विविध विभागातील खातेप्रमुखासह 22 पदे रिक्त असून अधिकाऱ्यांविना नगरपलिकेचा कारभार सुरु असून अतिरिक्त कामाचा बोजा असलेल्या कर्मचाऱ्यांवर पडत असून ही रिक्त पदे तातडीने पदे भरावित अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

या रिक्त पदामुळे पालिकेच्या कामकाजावर मोठा परिणाम होत असून असलेल्या कर्मचाऱ्यांवर या अतिरिक्त कामाचा भार पडला असून नागरिकांचे प्रश्‍न आणि शासकीय कामकाज करताना पालिकेला मोठया अडचणीला सामोरे जावे लागत असले तरी स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये देशातील नगरपालिकात चौथ्या क्रमांकावरील पालिका आज अव्वल स्थानावर आहे. अभियंता क्रमवारीत पाणीपुरवठा अभियंता चेतन माळी यांचा देशांत पाचवा क्रमांक आला. त्यामुळे 15 कोटीचा निधी विकासासाठी मिळणार असला तरी या निधीतून होणारी कामे व कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी नागरिकांच्या कामासाठी पालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. अग्निशमन विभागाकडे पाच पदे रिक्त असून लाखो रुपये खर्चान बांधलेली इमारत व असलेले वाहनाच्या देखभालीसाठी कर्मचारीच नसल्यामुळे अचानक आजीची समस्या उदभवल्यावर असलेल्या यंत्रणेचा वापर मनुष्यबळाअभावी कुचकामी ठरत आहेत. शिवाय अन्य महत्त्वाच्या विभागातही रिक्त पदे आहेत.

नगरपलिकेडे रिक्त असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सहायक निरीक्षक, सहायक मिळकत व्यवस्थापक, लेखापाल, लेखा परिक्षक, सहायक लेखा परिक्षक, सहायक कर निरीक्षक, उदयान पर्यवेक्षक, सहायक अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक, वाहन चालक, फायर मन चार पदे, कनिष्ठ रचना सहायक, प्रयोगशाळा सहायक, कनिष्ठ विदयुत पर्यवेक्षक, नगर अभियंता संगणक, पाणी पुरवठा जलनिशारण व स्वच्छता अभियंता, कार्यालयीन अधिक्षक, सहायक विधी व कामगार पर्यवेक्षक, खरेदी व भांडार पर्यवेक्षक, सहायक समाज कल्याण व जनसंपर्क पर्यवेक्षक अशी वर्ग तीनची 17 व वर्ग चार 5 अशी 22 पदे रिक्त असल्याने पालिकेच्या कामकाजावर मोठा परिणाम जाणवत आहे.

अधिकाऱ्यांची पदे रिक्त असताना कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या मदतीने पालिकेचे कामकाज राज्यात अव्वल ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.
- डॉ. निलेश देशमुख

रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे मागणी केली आहे. रिक्त पदामुळे पालिकेच्या कामकाजावर परिणाम होत कार्यरत कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त काम करुन शहराचा नाव लावलौकीक कायम ठेवला असून ही रिक्त पदे भरण्याबाबतची मागणी केली आहे.
- अरुणा माळी नगराध्यक्षा 

संतांच्या नगरातील नागरिकाचे प्रश्न आणि विकासकामासाठी पुरेसे मनुष्यबळ असणे आवश्यक आहे. पण ही पदे न भरल्यामुळे याबाबत विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला असून याबाबत आवाज उठविणार आहे.
- आ. भारत भालके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com