सोलापूर: मोहोळ तालुक्यात शेतकऱ्यांचे मंजूर अनुदान पडून

राजकुमार शहा
शनिवार, 20 जानेवारी 2018

गेल्या दोन वर्षात मोहोळ तालुक्यात अत्यंत कमी पाऊस पडला. त्यामुळे मोठी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. नद्या आष्टी तलाव विहीर बोअर आदीसह अन्य पाणीस्त्रोत आटले होते, तर ऊस केळी मका या पिकासह द्राक्ष, डाळींब या फळबागा जळुन गेल्या होत्या. शासनाने प्रत्येक तहसीलदारांना आपापल्या तालुक्यातील नुकसानीचा आराखडा तयार करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश दिले होते.

मोहोळ : सन 2015/16 या वर्षातील मोहोळ तालुक्याला मिळालेले 4 कोटी 36 लाख रुपये अनुदानापैकी 1 कोटी 70 लाख रुपये शेतकऱ्यांनी अद्यापही बँक खाते नंबर व इतर कागद पत्रकांची पूर्तता न केल्याने पडून आहेत. येत्या 26 जानेवारीपर्यंत पुर्तता न केल्यास सदरचे अनुदान शासनाला परत पाठविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार बी. आर. माळी यांनी दिली.

गेल्या दोन वर्षात मोहोळ तालुक्यात अत्यंत कमी पाऊस पडला. त्यामुळे मोठी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. नद्या आष्टी तलाव विहीर बोअर आदीसह अन्य पाणीस्त्रोत आटले होते, तर ऊस केळी मका या पिकासह द्राक्ष, डाळींब या फळबागा जळुन गेल्या होत्या. शासनाने प्रत्येक तहसीलदारांना आपापल्या तालुक्यातील नुकसानीचा आराखडा तयार करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार माळी यांनी कृषी विभागासह अन्य विभागातील अधिकारी  व कर्मच्याऱ्यांच्या सहकार्याने तालुक्याचा 4 कोटी 36 लाखाचा दुष्काळी आराखडा तयार करून मंजुरीस पाठविला होता. त्यानुसार 4 कोटी 36 लाख रुपये मंजुर झाले. त्यापैकी ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्र पुर्तता केली होती, त्यांना 2 कोटी 65 लाखाचे अनुदान वाटप केले. तर अद्यापही 1 कोटी 70 लाख रुपये अनुदान केवळ शेतकऱ्यांनी कागदपत्रकांची पुर्तता न केल्यान पडुन आहेत. येत्या 26 जानेवारी पर्यंत पुर्तता करावी अन्यथा शिल्लक अनुदान शासनास जमा करण्यात येणार असल्याचे माळी यांनी सांगितले.

Web Title: Marathi news Solapur news Mohol farmers subsidy