'आगामी काळातील मोहोळचा आमदार हा भाजपाचा'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

मोहोळ - आगामी काळात येऊ घातलेली लोकसभा व विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन पक्षात एक दिलाने काम करा आगामी काळातील मोहोळचा आमदार हा भाजपाचाच असेल असे प्रतिपादन भाजपाचे सोलापुर जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी केले

लोकसभा व विधानसभा निवडणुकाच्या पाश्र्वभुमिवर ता 29 मार्च ते4 एप्रील या कालावधीत   बुथ चलो अभियान राबविण्याचे असुन त्यासाठी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते त्यावेळी पवार  मार्गदर्शन करीत होते तालुका अध्यक्ष सतीश काळे अध्यक्षस्थानी होते 

पवार पुढे म्हणाले येत्या ६ एप्रील रोजी भाजपाचा स्थापना दिन आहे त्या पाश्र्वभुमीवर मुंबई येथे महामेळाव्याचे आयोजन केले आहे त्यासाठी तालुक्यातील जास्तीत जास्त कार्यकर्त्यानी मुंबईला यावे लवकरच बुथ एजंटाना मार्गदर्शनासाठी कार्यशाळा आयोजीत करण्यात येणार आहे 

तालुका अध्यक्ष सतीश काळे म्हणाले आपापसातील गट तट बाजुला ठेऊन कार्यकर्त्यानी कामाला लागावे तसेच भाजपाची ध्येय धोरणे सर्वसामान्यापर्यंत पोचवावी व शासकीय योजनांचा लाभ त्यांच्या पर्यंत पोचवीण्यासाठी प्रयत्न करावेत  

यावेळी सुरेश राऊत अजय कुर्डे अंजली काटकर संजय क्षिरसागर सतीश पाटील  अजय गावडे उतम मुळे  साईनाथ कोळी आदि सह कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थीत होते.

Web Title: marathi news solapur news Mohol MLA BJP politics