सोलापूर महापालिका बरखास्तीची मागणी

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 6 डिसेंबर 2017

..तर होऊ शकते महापालिका बरखास्त 
महापालिका अधिनियम 1949 मधील कलम 452 नुसार महापालिका विसर्जित करण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. या अधिनियमाद्वारे किंवा त्या वेळी असलेल्या कायद्यानुसार महापालिकेवर लादण्यात आलेली कर्तव्ये पार पाडण्यात महापालिका कसूर करीत आहे किंवा कर्तव्ये पार पाडण्यात जाणीवपूर्वक कुसूर करीत आहे, हे सिद्ध झाले तर राज्य सरकार राजपत्रात बरखास्तीची कारणे नमूद करून महापालिका बरखास्त करू शकते. मात्र तत्पूर्वी, बरखास्त का करू नये, अशी नोटीस संबंधित महापालिकेस बजावणे बंधनकारक आहे.

सोलापूर : महापालिकेतील दोन गटांतील वादामुळे शहर विकास रखडला आहे. त्यामुळे महापालिका बरखास्त करून प्रशासक नेमावा, अशी मागणी अतुल्य सेवा प्रतिष्ठानने केली होती. त्यांच्या मागणीचे पत्र राज्य सरकारकडे पाठवावे किंवा बरखास्तीचा अधिकार सरकारचा आहे हे संबंधित संस्थेला कळवावे, याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा असा अभिप्राय महापालिका विधान सल्लागारांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेस कार्यवाहीचा आदेश दिला होता. 

प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास यन्नम यांनी महापालिका बरखास्तीचे पत्र 18 सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी ते योग्य कार्यवाहीसाठी महापालिका आयुक्तांकडे पाठविले. आयुक्तांनी ते मुख्य लेखापाल कार्यालयाकडे, तेथून ते नगरसचिव कार्यालयाकडे गेले. त्यानुसार विधान सल्लागार कार्यालयाने अभिप्राय दिला असून, संबंधित अभिप्रायाची प्रत संस्थेच्या अध्यक्षांना द्यायची की सरकारकडे पाठवायची, याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागणार आहे. 

सहा महिन्यांपूर्वी महापालिकेत भाजपची सत्ता आली. सत्तांतर झाल्यावर शहराचा विकास होईल, या अपेक्षेमध्ये 11 लाख सोलापूरकर होते. मात्र महापालिकेतील दोन गटांच्या वादामुळे विकासकामे रखडली आहेत. पालिकेत सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण, अशी स्थिती आहे. त्यामुळे महापालिका तातडीने बरखास्त करावी, या मागणीचे पत्र राष्ट्रपती, राज्यपाल यांनाही पाठविणार आहे, असे निवेदन श्री. यन्नम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. 

..तर होऊ शकते महापालिका बरखास्त 
महापालिका अधिनियम 1949 मधील कलम 452 नुसार महापालिका विसर्जित करण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. या अधिनियमाद्वारे किंवा त्या वेळी असलेल्या कायद्यानुसार महापालिकेवर लादण्यात आलेली कर्तव्ये पार पाडण्यात महापालिका कसूर करीत आहे किंवा कर्तव्ये पार पाडण्यात जाणीवपूर्वक कुसूर करीत आहे, हे सिद्ध झाले तर राज्य सरकार राजपत्रात बरखास्तीची कारणे नमूद करून महापालिका बरखास्त करू शकते. मात्र तत्पूर्वी, बरखास्त का करू नये, अशी नोटीस संबंधित महापालिकेस बजावणे बंधनकारक आहे.

Web Title: marathi news Solapur news Municipal Corporation