सोलापूर: स्थायी समितीच्या आठ सदस्यांचे भवितव्य 'चिठ्ठीत'

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 20 जानेवारी 2018

स्थायी समितीमध्ये सभापती संजय कोळी, श्रीनिवास करली, नागेश वल्याळ, रवी गायकवाड, श्रीनिवास रिकमल्ले, मनीषा हुच्चे, राजेश्री बिराजदार, मीनाक्षी कंपल्ली (भाजप), महेश कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर व विठ्ठल कोटा (शिवसेना), प्रवीण निकाळजे व नरसिंग कोळी (कॉंग्रेस), आनंद चंदनशिवे (बहुजन समाज पक्ष), नागेश गायकवाड (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आणि तस्लिम शेख (एमआयएम) हे सदस्य आहेत. त्यापैकी आठजणांची चिठ्ठी निघेल. 

सोलापूर : महापालिका स्थायी समितीच्या आठ सदस्य निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सभापतींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सभेत आठ सदस्यांच्या नावाची चिठ्ठी काढली जाईल व ते समितीतून बाहेर पडतील. 

महापालिका स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. त्यांच्या सदस्यत्वाचा कालावधी दोन वर्षांचा आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. ती नावे चिठ्ठीद्वारे निश्‍चित केले जातात. फेब्रुवारीच्या सभेत नवीन सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्याअगोदर ही चिठ्ठीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात होणाऱ्या सभेत समितीतील आठ सदस्य बाहेर पडतील. 

स्थायी समितीमध्ये सभापती संजय कोळी, श्रीनिवास करली, नागेश वल्याळ, रवी गायकवाड, श्रीनिवास रिकमल्ले, मनीषा हुच्चे, राजेश्री बिराजदार, मीनाक्षी कंपल्ली (भाजप), महेश कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर व विठ्ठल कोटा (शिवसेना), प्रवीण निकाळजे व नरसिंग कोळी (कॉंग्रेस), आनंद चंदनशिवे (बहुजन समाज पक्ष), नागेश गायकवाड (राष्ट्रवादी कॉंग्रेस) आणि तस्लिम शेख (एमआयएम) हे सदस्य आहेत. त्यापैकी आठजणांची चिठ्ठी निघेल. 

आकडे बोलतात... 
असे आहे पक्षीय बलाबल.. 
भाजप ः 08 
शिवसेना ः 03 
कॉंग्रेस ः 02 
राष्ट्रवादी कॉंग्रेस ः 01 
बसप ः 01 
एमआयएम ः 01 

Web Title: Marathi news Solapur news municipal corporation