दिराच्या ऐवजी दुसराच इसम मारेकरी, आरोपीने दिला कबुली जबाब

चंद्रकांत देवकते
मंगळवार, 13 मार्च 2018

मोहोळ (सोलापूर) : बांधकामावर मजुर म्हणुन काम करणाऱ्या इसमाला दोरीने गळा आवळून त्याच्याच पत्नीने ठार मारल्याची घटना मंगळवारी (ता. ६) कोळेगांव (ता.  मोहोळ) येथे घडली होती. अनैतिक संबंधास आड येणाऱ्या पतीचा दिराच्या मदतीने खुन केल्याची कबुली मयताच्या पत्नीने पोलीसांना दिली होती. मात्र पोलीस तपासामध्ये या खुन प्रकरणाला वेगळेच वळण लागले असून रेल्वे स्टेशन येथील बलभीम नागनाथ पाटील याचा या घटनेत सहभाग आसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असुन या प्रकरणात  त्याला पोलीसांनी अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.       

याबाबत  पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार युवराज उर्फ बापू देवीदास कापुरे याला  त्याची पत्नी मोनाली हिने (ता. ६) राहत्या घरी रात्री ११.३०च्या दरम्यान दोरीने गळा आवळून पतीचा खुन केला होता. पोलीसांनी तिला अटक केल्यानंतर मी व माझे दिर आकाश यांनी संगनमताने युवराज यांचा गळा आवळून खुन केल्याची कबुली तिने दिली होती. तिच्या जबाबावरून दिर आकाश कापुरे यास अटक करण्यात आली होती. 

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे यांनी मोनाली हिचे मोबाईल कॉल डिटेल्स तपासले असता घटने दिवशी मयत युवराज व बलभीम पाटील हे दोघे ९ वाजे पर्यंत सोबत होते. बलभीम यांने युवराज यास भरपूर दारू पाजली होती. व  त्याच दरम्यान बलभीम मोनालीस सतत फोन करीत असल्याचे तपासात  आढळले आहे .तर घटनेनंतर पाटील हा दोन दिवस मोबाईल बंद ठेऊन बेपत्ता होता .                      

तपासात तु माझे नाव घेतले  तर तुझ्या  मुलांना जिवे मारीन अशी धमकी बलभीम पाटील याने मोनालीला दिली त्यामुळे मी बलभीम पाटील याचे नाव न घेतल्याचे तिने  सांगितले आहे. मयताची पत्नी मोनाली हिने दिलेल्या जबाबावरून व तपासातुन मिळालेल्या कॉलवरून संशयीत आरोपी म्हणुन बलभीम पाटील याला या प्रकरणी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आसल्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम बोधे यांनी सांगितले आहे. या खुन प्रकरणी तिसरा संशयित आरोपीस अटक केल्यामुळे अधिक बारकाईने पोलीस तपास करीत असुन मोबाईल कॉल, व घटनेदिवशीच्या घडलेल्या घटनाक्रमात आणखी कोणाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभाग आहे का? याचीही शक्यता पडताळून पाहिली जात आहे. 

Web Title: Marathi news solapur news murder crime victim accused