महावितरणच्या "नवप्रकाश' योजनेला ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

संतोष सिरसट
बुधवार, 14 जून 2017

सोलापूर - कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकी मुक्तीसाठी सुरू करण्यात आलेल्या "नवप्रकाश योजने'ला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

सोलापूर - कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या कृषी ग्राहकांसह सर्व उच्च व लघुदाब वीज ग्राहकांच्या थकबाकी मुक्तीसाठी सुरू करण्यात आलेल्या "नवप्रकाश योजने'ला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या योजनेत सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजना वगळता इतर ग्राहकांनी जून ते 31 ऑगस्ट या कालावधीत थकबाकीची मूळ रक्कम भरल्यास 75 टक्के व्याज व विलंबआकाराची 100 टक्के रक्कम माफ होणार आहे. या योजनेत थकबाकीची मूळ रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्‍शन चार्जेस, रिकनेक्‍शन चार्जेस यामध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. ग्राहकांना कोणत्याही प्रतिज्ञापत्राची गरज लागणार नाही. शिवाय वीजजोडणीचा अर्ज ग्राहकांना कार्यालयात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या संकेतस्थळावर ग्राहकाला थकीत देयकाची किती रक्कम भरावयाची आहे, याची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच इंटरनेटची सुविधा नसेल अशा ग्राहकांना त्यांच्या थकबाकीच्या रकमेचा तपशील महावितरणच्या शाखा कार्यालयापासून ते मंडल कार्यालयात तातडीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या वीजग्राहकांनी या नवप्रकाश योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Web Title: marathi news solapur news navprakash electricity issue maharashtra news