सोलापूर: अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

वसंत कांबळे
रविवार, 4 मार्च 2018

अज्ञात वाहन घटनास्थळी न थांबता कुर्डुवाडीच्या दिशेने निघुन गेले असल्याची चर्चा उपस्थित करत होते. त्या अज्ञात वाहनाचा पोलिस तपास करीत आहेत.

कुर्डु  (सोलापूर) : अंबाड ता माढा येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज (रविवार) सकाळी 11.30 च्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी, की मयत कल्याण मुरलीधर कदम (वय ५५) हे रा. अंबाड गावातुन मोटारसायकलवरुन त्यांच्या शेताकडे जात असताना कुर्डूवाडी-टेंभुर्णी रोडवरील अंबाड हद्दीतील कदम वस्ती येथे कुर्डुवाडीकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जोराची धडक दिल्याने कदम यांचा जागीच मृत्यू झाला.

अज्ञात वाहन घटनास्थळी न थांबता कुर्डुवाडीच्या दिशेने निघुन गेले असल्याची चर्चा उपस्थित करत होते. त्या अज्ञात वाहनाचा पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: Marathi news Solapur news one dead in accident