पतंजली योग समितीचा मेळावा व नियोजन बैठक

राजशेखर चौधरी
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथे दि १७ ते १९ मार्च या कालावधीत आयोजित केलेल्या रामदेवबाबा यांच्या योग शिबिराच्या पार्श्वभूमीवर आणि पंढरपूर येथे होणाऱ्या शेतकरी मेळावा आणि सोलापूर येथे होणारा महिला मेळावा याच्या नियोजनासाठी रविवार (ता. ४) दुपारी एक वाजता आर्य समाज मंदिर सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा योग समितीने दिली आहे.

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट येथे दि १७ ते १९ मार्च या कालावधीत आयोजित केलेल्या रामदेवबाबा यांच्या योग शिबिराच्या पार्श्वभूमीवर आणि पंढरपूर येथे होणाऱ्या शेतकरी मेळावा आणि सोलापूर येथे होणारा महिला मेळावा याच्या नियोजनासाठी रविवार (ता. ४) दुपारी एक वाजता आर्य समाज मंदिर सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती सोलापूर जिल्हा योग समितीने दिली आहे. यावेळी या तिन्ही ठिकाणी होणाऱ्या शिबिर आणि मेळावे हे यशस्वी करण्यासाठी आणि त्याची व्याप्ती आणि माहिती तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी सोलापूर जिल्हा योग समिती, जिल्हा महिला योग समिती आणि प्रत्येक तालुक्यातील पुरुष आणि महिला योग समिती आणि त्यांचे आयोजक यांची बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी ग्रामीण आणि शहरी भागात घरोघरी जाऊन याची माहिती आणि उद्देश स्पष्ट करणे आणि त्याचा होणार लाभ आदींची माहिती दिली जाणार आहे.

अक्कलकोटला विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिन कल्याणशेट्टी यांनी १७ ते १९ ला फत्तेसिंह मैदानावर योग व चिकित्सा शिबिर ज्यात एक लाख लोक सहभाग घेतील तसेच पंढरपूरला रेल्वे मैदानावर दि १७ मार्च रोजी सी. पी. बागल यांनी दुपारी तीन वाजता आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात जवळपास एक लाख शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती आणि त्यासाठी पतंजली योग समिती करत असलेले काम आणि उत्पादन वाढीचे सर्व आधुनिक तंत्र आदींची माहिती दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा महिला समिती आयोजित दि १८ मार्च रोजी दुपारी तीन वाजता सोलापूरला पार्क मैदानावर एक लाख महिलांचा मेळावा घेतला जाणार आहे. त्यात महिला समस्या व त्यावर उपाय आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. यावेळी राज्य महिला प्रभारी सुधाताई अळळीमोरे, श्रीराम लाके, अविनाश अळ्ळीमोरे, रघुनंदन भुतडा, नितीन मोरे, सचिन कल्याणशेट्टी, संतोष दुधाळ, दिलीप कोलते, रत्नाबाई माळी, चंद्रकांत बागल, विजय पाटील व सर्व कार्यकर्ते आणि योग प्रचारक आणि प्रसारक यांच्यासह सर्व योग समिती उपस्थिती राहणार आहे.

 

Web Title: Marathi news solapur news patanjali yog planning