सोलापूर जिल्ह्यात महिन्याच्या आतच रस्त्यांवर खड्डे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

सार्वजनिक बांधकाममंञी चंद्रकात पाटील यांनी आदेश दिल्यानंतर प्रशासन कामाला लागले. माञ काम कसे होत आहे याकडे हवं तसे लक्ष दिलेच नाही. निकृष्ट काम झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडायला लागले आहेत.

सोलापूर : खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी घाईघडबडीत बुजवण्यात आलेले खड्डे महिन्याच्या आतच उखडायला लागले आहेत.

सार्वजनिक बांधकाममंञी चंद्रकात पाटील यांनी आदेश दिल्यानंतर प्रशासन कामाला लागले. माञ काम कसे होत आहे याकडे हवं तसे लक्ष दिलेच नाही. निकृष्ट काम झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडायला लागले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात एक-दोन महिन्यापूर्वी बांधकाममंञी पाटील यांनी सार्वजिनक बांधकाम विभागातील अधिकार्यांची बैठक घेऊन रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला होता. १५ डिसेंबरपर्वी सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या यावेळी सुचना दिल्या होत्या. त्यावर आवल घालत घाईमध्ये काही ठिकाणी निकृष्टपणे खड्डे बुजले. आता ते उखडायला लागले आहेत. टेंभुर्णी- करमाळा- जातेगाव या राज्यामार्गावर काही ठिकाणी खड्डे उखडले आहेत. काही ठिकाणचे तर खड्डेच बुजायचे राहिले आहेत. सोलापूर व नगर या जिल्हान जोडणारा करमाळा- जामखेड या रस्यावर सोलापूरच्या हद्दीतील सर्व खड्डे बुजले होते. काही ठिकाणी नवीन रस्ता केला होता. माञ त्यावर खड्डे पडले आहेत.

Web Title: Marathi news Solapur news potholes in Solapur