पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र होऊनही 'तारीख पे तारीख'

अक्षय गुंड
सोमवार, 11 डिसेंबर 2017

जिल्ह्यातील 43 उमेदवारांचे प्रशिक्षणांच्या प्रतिक्षेत
खात्याअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक परिक्षेत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण पोलिस दलातील 6, शहर पोलिस दलातील 16, राज्य राखीव पोलिस दल गट क्र 10 मधिल 21 अश्या 43 पोलिस कर्मचार्यांची यात निवड झालेली आहे. परंतु सध्या ते प्रशिक्षणांच्या प्रतिक्षेत आहेत.

उपळाई बुद्रूक (जि. सोलापुर) : राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने 2016 मध्ये पोलिस खात्याअंतर्गत घेण्यात आलेल्या विभागीय मर्यादित पोलिस उपनिरीक्षक परिक्षेत 828 पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया झाली असुन, राज्य सरकारच्या गृहखात्यातील अधिकाऱ्यांच्या उदासीन भुमिकेमुळे भावी पोलिस उपनिरीक्षकांना 'तारीख पे तारीख' देवुन प्रशिक्षणापासुन वंचित ठेवण्यात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे गृहखात्यावर दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने 21 जून 2016 रोजी 828 जागांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या नियोजनानुसार 21 ऑगस्ट 2016 रोजी लेखी परीक्षा, पात्र उमेदवारांची 21 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर 2016 दरम्यान शारीरिक चाचणी व 5 मे 2017 रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार पात्र झालेल्या 828 उमेदवारांची यादी शासनाकडे पाठविण्यात आली. त्यानंतर राज्याच्या पोलीस महासंचालकांनी 10 ऑगस्ट 2017 रोजी नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी हजर राहण्याचे आदेश संबंधित प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांना लागू केले होते.

काही महिन्यातच आपण पोलिस उपनिरीक्षक म्हणुन रूजू होणार हे स्वप्न उराशी बाळगून पात्र झालेल्या उमेदवारांनी, नाशिक येथे वर्षभर प्रशिक्षण चालणार हे गृहीत धरून आपआपल्या मुलांचे शैक्षणिक नियोजन करून कुटूंब गावी स्थंलातरीत केली. दरम्यान या परिक्षेत निवड न झालेल्या काही उमेदवारांनी मॅटसह उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल करून गुणवत्ता यादीवर हरकत घेतली. दरम्यान उच्च न्यायालयाने हि याचिका फेटाळली. तसेच उच्च न्यायालयाने निवड झालेल्या 828 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू करण्याचे आदेश दिले. पात्र उमेदवारांना ता.13 नोव्हेंबर  ला प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलिस अकादमी येथे हजर राहण्याचे आदेश पोलिस महासंचालकांनी दिले. मात्र गृहविभागाकडून कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले जात नसल्याने व अद्याप प्रशिक्षण सुरू न झाल्याने उमेदवारांना स्वतःच्या कुटुंबियांकडे लक्ष देणे अवघड झाले असुन, मानसिक खच्चीकरण होत असल्याचे मत पात्र उमेदवारांनी या विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकाद्वारे निवेदन देवुन तसेच ट्विटरवर ट्विट करून या प्रकरणाची माहिती दिली आहे. मात्र इतर किरकोळ बाबतीत ट्विट करणार्‍या मुख्यमंत्र्यांना स्वता:कडे असलेल्या गृह खात्यातील प्रश्नाकडे गांभीर्याने बघायला वेळच मिळत नाही. 

जिल्ह्यातील 43 उमेदवारांचे प्रशिक्षणांच्या प्रतिक्षेत
खात्याअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक परिक्षेत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण पोलिस दलातील 6, शहर पोलिस दलातील 16, राज्य राखीव पोलिस दल गट क्र 10 मधिल 21 अश्या 43 पोलिस कर्मचार्यांची यात निवड झालेली आहे. परंतु सध्या ते प्रशिक्षणांच्या प्रतिक्षेत आहेत.

Web Title: Marathi news Solapur news PSI qualification