ठराव नसताना रामदेवबाबांना मानपत्र देण्याचा मानस

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 17 मार्च 2018

सोलापूर - महापालिका सभेचा ठराव झाला नसतानाही योगगुरू रामदेवबाबा यांना महापालिकेचे मानपत्र देण्यासाठी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. मात्र प्रशासनाकडून त्याला "हिरवा कंदील' मिळणार का? याबाबत उत्सुकता आहे. 

सोलापूर - महापालिका सभेचा ठराव झाला नसतानाही योगगुरू रामदेवबाबा यांना महापालिकेचे मानपत्र देण्यासाठी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. मात्र प्रशासनाकडून त्याला "हिरवा कंदील' मिळणार का? याबाबत उत्सुकता आहे. 

योगाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सोलापूर महापालिकेच्यावतीने रामदेवबाबांचा मानपत्र देऊन गौरव करण्याचा प्रस्ताव जानेवारी 2018च्या विषयपत्रिकेवर आहे. मात्र ही सभा तहकूब झाल्याने या प्रस्तावावर निर्णय झाला नाही. मानपत्र द्यायचे असेल तर त्यासाठी महापालिकेचा ठराव होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे मानपत्र देण्यासंदर्भातील कार्यवाहीत तांत्रिक मुद्दे उपस्थित होऊ शकतात. रामदेवबाबा सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत, हे दोन महिन्यापूर्वीच स्पष्ट झाले होते. त्यामुळे जानेवारीची सभा बोलावून निर्णय करता आला असता, पण ते शक्‍य झाले नाही. 

महापौर शोभा बनशेट्टी यांनी विनंती केल्यामुळे विरोधी पक्षनेते महेश कोठे, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, एमआयएमचे गटनेते तौफीक शेख यांनी मानपत्राबाबत आक्षेप घेतला नाही. मात्र प्रशासकीय दृष्ट्या ठराव झालेला नसताना मानपत्र देणे योग्य होणार नसल्याचे मत व्यक्त होत आहे. या संदर्भात आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना प्रतिक्रिया विचारली असता, मानपत्र देण्यासाठी येणाऱ्या खर्चापुरता प्रशासनाचा संबंध आहे, असे सांगितले. मात्र ठराव झाला नसताना मानपत्र देणे योग्य आहे का, असे विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळले. 

महापौरांनी विनंती केल्यामुळे आम्ही मानपत्राबाबत आक्षेप घेतला नाही. तथापि, प्रशासकीय अडचणी येणार असतील तर त्याबाबत सत्ताधारीच पक्ष जबाबदार असेल. 
- चेतन नरोटे, गटनेता, कॉंग्रेस 

Web Title: marathi news solapur news ramdev baba MNP