'सकाळ'च्या पाठपुराव्यामुळे मंगळवेढ्यात शेतकऱ्याला मिळाला हमीभाव

हुकूम मुलाणी
सोमवार, 15 जानेवारी 2018

मंगळवेढा : शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मका हमी भाव केंद्रातील खरेदी नव्या वर्षापासून बंद केल्यामुळे तालुक्यातील 478 शेतकऱ्यांची जवळपास 15 हजार क्विंटल मका खरेदीवाचून राहिल्यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना कमी भावात मका विकण्याची वेळ आली असल्याचे वृत्त सर्वप्रथम दै. सकाळने प्रसिद्ध केल्यामुळे मका खरेदी करण्याचे आदेश मिळाल्याने शेतकऱ्यांनी सकाळला धन्यवाद दिले.

शेतकऱ्याला शेतीतून मिळणाऱ्या मालाला हमी भाव मिळावा व व्यापाऱ्यांकडून होणारी लूट थांबावी या उद्देशाने शासनाने फेडरेशनच्या माध्यमातून मका उत्पादक शेतकऱ्यांना मालाची विक्री करण्यासाठी तालुका स्तरावर शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे हमी भाव केंद्रे सुरु केल्यामुळे तालुक्यातील तुर व मक्याची विक्री करणाऱ्या शेतकऱ्याला फायदा झाला. 

मंगळवेढा येथील हमी केंद्रावरील व्यवस्थेमुळे तालुक्याबरोबर सांगोला, पंढरपूर, मोहोळ व अन्य ठिकाणचे शेतकरी मालाची विक्री करण्यास येऊ लागले. आलेल्या शेतकऱ्याला एक रुपयात नाष्टा देऊन त्यांचीही उपासमार थांबवली. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या मक्याची खरेदी करताना तालुक्यातून 840 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यामधील 362 शेतकऱ्यांकडून 11042.50 क्विंटल मक्याची खरेदी करुन त्यांच्या रकमा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्या. 31 डिसेंबर पर्यत खरेदी आली आणखी नोंदणी 478 शेतकरी वंचीत असल्याचे वृत्त सकाळने प्रसिद्ध करून शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्याला कमी किंमतीत विकाव्या लागणाऱ्या तुटीबाबात आवाज उठविला. शिल्लक मका असल्याने खरेदी सुरू करण्याबाबत मागणी केली होती शिवाय सकाळने वृत्त प्रसिद्ध करून वाचा फोडली खरेदी सुरू करावी याबाबत शुक्रवारी पत्र मिळाले असून बुधवार पासून खरेदी सुरू करणार आहे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनी सांगितले.

Web Title: marathi news solapur news rate to farmers