सोलापूर शहरातील 100 रस्त्यांच्या कामांना मुहूर्त

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 20 जानेवारी 2018

या योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या काही रस्त्यांमध्ये प्लास्टिकचा वापर केला जाणार आहे. निविदा मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यावर प्लास्टिक वापरणाऱ्या रस्त्यांची नावे निश्‍चित केली जातील. या शिवाय काही ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचेही काम होणार आहे. प्रस्तावित यादीतील 80 पैकी 79 कामे निविदेत समाविष्ट करण्यात आली आहेत. या योजनेचा खर्च मार्च 2018 अखेर खर्च होणे आवश्‍यक आहे. 

सोलापूर : शासनाच्या अनुदानातून करण्यात येणाऱ्या 100 रस्त्यांच्या कामांना मुहूर्त लागला आहे. महापालिकेने या कामाची निविदा काढली असून, रस्त्यांबरोबरच तीन ठिकाणी पुलांची बांधणी होणार आहे. 

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हे रस्ते निश्‍चित केले आहेत. महापालिकेने 107 रस्त्यांची यादी तयार केली होती. त्यापैकी 7 रस्ते हे इतर योजनेतून झाले असल्याने ते वगळण्यात आले आहेत. उर्वरीत 100 रस्त्यांची यादी निश्‍चित झाली आहे. या योजनेसाठी शासनाकडून 23 कोटी 84 लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. 100 पैकी 85 ठिकाणी रस्ते व बांधकाम होणार असून, 15 ठिकाणी जलवाहिनी व ड्रेनेजची सुविधा केली जाणार आहे. या कामासाठीचा सर्व निधी राज्य शासन देणार आहे. 

या योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या काही रस्त्यांमध्ये प्लास्टिकचा वापर केला जाणार आहे. निविदा मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यावर प्लास्टिक वापरणाऱ्या रस्त्यांची नावे निश्‍चित केली जातील. या शिवाय काही ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचेही काम होणार आहे. प्रस्तावित यादीतील 80 पैकी 79 कामे निविदेत समाविष्ट करण्यात आली आहेत. या योजनेचा खर्च मार्च 2018 अखेर खर्च होणे आवश्‍यक आहे. 

या ठिकाणी होतील पुलाचे काम 
---------------------- 
- जुना कारंबा नाका ते बार्शी टोलनाका रस्त्यावरील पूल 
- शेळगी नाल्यावर वसंत विहारच्या अप्रोच पूल 
- शेळगी नाल्यावरील पुलाचे गुमटे वस्ती येथे मजबुतीकरण 

Web Title: Marathi news Solapur news road work in Solapur

टॅग्स