लंपास केलेले सोने पोलिसांच्या ताब्यात

विजयकुमार कन्हेरे
शनिवार, 30 डिसेंबर 2017

कुर्डुवाडी : बंगळुरु (कर्नाटक) येथून मुंबईच्या व्यापाऱ्याचे सुमारे साडेसहा किलो वजनाचे सोने असणारी बॅग लंपास करुन पळालेल्या संशयित आरोपींकडून कर्नाटक पोलिसांनी कुर्डुवाडी पोलिसांच्या मदतीने सुमारे 2 किलो 367 ग्रॅम वजनाचे 68 लाख रुपये किमतीचे सोने व रोख 15 लाख रुपये असा एकुण 83 लाखांचा ऐवज शुक्रवारी (ता. 29) हस्तगत केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली. पंडित मुडया सुकळे व अर्जुन बापू जाधव( दोघेही राहणार ढवळस) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. सुमारे दोन महिन्यांपुर्वी बंगळुरु शहारमध्ये सोने असलेल्या बॅगेची चोरी झाल्याची घटना घडली होती.

कुर्डुवाडी : बंगळुरु (कर्नाटक) येथून मुंबईच्या व्यापाऱ्याचे सुमारे साडेसहा किलो वजनाचे सोने असणारी बॅग लंपास करुन पळालेल्या संशयित आरोपींकडून कर्नाटक पोलिसांनी कुर्डुवाडी पोलिसांच्या मदतीने सुमारे 2 किलो 367 ग्रॅम वजनाचे 68 लाख रुपये किमतीचे सोने व रोख 15 लाख रुपये असा एकुण 83 लाखांचा ऐवज शुक्रवारी (ता. 29) हस्तगत केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली. पंडित मुडया सुकळे व अर्जुन बापू जाधव( दोघेही राहणार ढवळस) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. सुमारे दोन महिन्यांपुर्वी बंगळुरु शहारमध्ये सोने असलेल्या बॅगेची चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चारचाकी गाडीतून कर्नाटक पोलिसांना मिळाले होते. त्यातील संशयीत आरोपी माढा तालुक्यातील ढवळस येथील असल्याचे निष्पन्न झाले होते. सुमारे 7 ते 8 जणांचे कर्नाटक पोलिसांचे पथक कुर्डुवाडीमध्ये आले होते. पोलिस अधिक्षक वीरेश प्रभु यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे, हवालदार रमेश मांदे यांनी कर्नाटक पोलिसांना सहकार्य केले. कर्नाटक व कुर्डुवाडी पोलिसांनी त्या दोघांना सुमारे 12 दिवसांपूर्वी पकडले होते. तपासामध्ये शुक्रवारी त्यांच्याकडुन सदरचा ऐवज हस्तगत केला. हस्तगत मुद्देमाल व दोघांना कर्नाटक पोलिस बंगळुरु येथे घेउन गेले.

 

Web Title: Marathi news solapur news robber arrested in banglore