सामाजिक कामांची माहिती घेण्यासाठी अमेरिकच्या डॉ. रिव्हीरा माढ्यात

किरण चव्हाण 
शनिवार, 27 जानेवारी 2018

माढा : भारताच्या ग्रामीण भागात चालणाऱ्या सामाजिक कामाची माहिती व ग्रामीण समाज जीवनाचा अनुभव घेण्यासाठी माढ्यातील नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासाठी भारतात आलेल्या अमेरिकच्या डॉ. एरिका रिव्हीरा या माढ्यातील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्याही मुख्य आकर्षण राहिल्या असून, भारतातील लोक आपल्याला सर्वाधिक आवडल्याची भावना तिने 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

माढ्यातील माढेश्वरी बँक, विठ्ठलराव शिंदे कारखान्याच्या वतीने आयोजित नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात शस्त्रक्रियेसाठी मागील नऊ वर्षांपासून पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख येत आहेत. यंदाही 25 जानेवारीपासून या शिबिराला सुरवात झाली. यंदा त्यांच्यासमवेत मुंबईत वैद्यकीय शिक्षणाची पद्युत्तर पदवीचे शिक्षण घेतलेली अमेरिकेतील एरिका रिव्हीरा ही या शिबिरासाठी आवर्जून माढयात आली आहे.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमातही तिने सहभाग घेतला. माढा तहसील कार्यालयाच्या मुख्य कार्यक्रमासह माढयातील विविध शाळांमधे झालेल्या कार्यक्रमात तिने सहभाग घेतला. यावेळी तिला महाराष्ट्रीयन फेटा घालण्यात आला. भारतातील लोक, त्यांचे स्वभाव व आपलेपणाने वागण्याची भावना आपल्याला सर्वाधिक आवडल्याचे तिने सांगितले.

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारेख हे माझे भारतातील पालकच असल्याचे सांगून डॉ. तात्याराव लहाने यांच्याप्रमाणे अमेरिकेतही सामाजिक काम करणार असल्याचे तिने सांगितले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी डॉ. एरिकासमवेत आ. बबनराव शिंदे, माजी आमदार धनाजीराव साठे, प्रांताधिकारी मारूती बोरकर, तहसीलदार सदाशिव पडदुणे, माढेश्वरी बँकेचे उपाध्यक्ष अशोक लुणावत उपस्थित होते.

Web Title: Marathi News Solapur News rural area social work information dr rivira came from america