फडणवीस सांगतील तेथून माझ्यासह रयत क्रांतीसेनेचे कार्यकर्ते भाजपकडून लढतील - खोत

किरण चव्हाण 
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

माढा (सोलापूर) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा कोणत्याही मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर माझ्यासह रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते निवडणुका लढविणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उंदरगाव (ता. माढा जिल्हा सोलापूर) येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना शनिवारी (ता. 24) सांगितले.

माढा (सोलापूर) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा कोणत्याही मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर माझ्यासह रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते निवडणुका लढविणार असल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उंदरगाव (ता. माढा जिल्हा सोलापूर) येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना शनिवारी (ता. 24) सांगितले.

उंदरगाव येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना खोत म्हणाले की, रयत क्रांती संघटना ही राजकीय संघटना नाही. शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी ही संघटना आहे. आगामी लोकसभा अथवा विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतील तेथून माझ्यासह रयत क्रांतीसेनेचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर लढतील असे स्पष्टपणे सांगितले. रिधोरे (ता. माढा) येथे ज्यांनी त्यांच्या ताफ्यातील गाडीच्या काचा फोडल्याबाबत विचारले  असता त्या कार्यकर्त्यांविरूध्द माझा रोष नाही. त्यांनी अजाणतेपणाने हे काम केले असेल पण या मागचा म्होरक्या शोधण्याची गरज आहे. मी  माझ्या कार्यकर्त्यांनी शांततेचे आवाहन केले आहे. 

सदाभाऊ खोतांची काही जणांना कावीळ झाली आहे. खा. राजू शेट्टींना विचाराची लढाई विचाराने लढता येत नाही. त्यांच्या विचार संपला आहे. त्यामुळे ते कासावीस झाले आहेत. त्यांचे पित्त खवळले आहे. पण मी कोणत्याही झुंडशाहीला घाबरणार नाही. शेतकऱ्यांसाठी मरण आले तरी चालेल पण शेतकऱ्यांचे प्रश्न घेवून ते सोडविण्यासाठी लढणार आहे. ज्यांच्या विरोधात पंधरा वीस वर्षे संघर्ष केला. त्यांच्या हातात हात घालून त्यांच्या मांडीला मांडी लावून स्वाभिमानीचे नेतृत्व बसत असून त्यांचे गुणगाण गात आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रती आस्था राहिलेली नाही तर आपली खासदारकी कशी टिकेल आणि मीच कसा मोठा नेता आहे यासाठी त्यांची आता धडपड चालेली आहे असे सांगितले. ज्या कारखान्यांनी उसाची एफ . आर. पी. दिली नाही. त्या काऱखान्यावर शासन शंभर टक्के फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार असल्याचे खोत म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news solapur news sadabhau khot