निवाऱ्याअभावी वाटसरू रस्त्यावर! 

अशोक मुरूमकर
बुधवार, 14 मार्च 2018

सोलापूर - रेल्वेस्थानक परिसर, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय व परिसरात अनेकांना निवाऱ्याअभावी रस्त्यावर रात्र काढावी लागत आहे. सोमवारी (ता. 12) मध्यरात्री "सकाळ'ने शहरात पाहणी केली, त्यामध्ये मन हेलवणारे चित्र दिसले. काहींना धर्मशाळेची माहितीच नाही, तर रेल्वेस्थानक परिसरातील धर्मशाळा बंद असल्याने उघड्यावर झोपण्याची वेळ येत आहे, असे समोर आले. रेल्वे स्थानकासमोरील धर्मशाळेत महापालिकेने भिकाऱ्यांची व्यवस्था केली असल्याचे सांगितले जात आहे, परंतु रात्री तिथे ना भिकारी, ना वाटसरू असे चित्र आहे. 

गावोगाव फिरणाऱ्या वाटसरू व निराश्रितांना निवाऱ्याची सोय व्हावी म्हणून शहरात धर्मशाळा सुरू केल्या आहेत. शासकीय रुग्णालयात नातेवाइकांची व्यवस्था व्हावी, म्हणून सद्‌भावना धर्मशाळा सुरू आहे. तर रेल्वे स्थानकासमोरची धर्मशाळा बंद आहे. तिथे भिकाऱ्यांची व्यवस्था केली आहे. ही धर्मशाळा बंद असल्यामुळे अनेकांना उघड्यावर झोपावे लागत आहे. सर्वोपचार रुग्णालयातील धर्मशाळेची क्षमता फक्त 40 जणांची आहे. तिथे जागा कमी पडते. धर्मशाळा काहींना माहीत नसल्याने नातेवाइकांना बाहेर रात्र काढावी लागत आहे. सोमवारी पोलिस भरतीमुळे बाहेरच्या ठिकाणाहून उमेदवार शहरात आले होते. मंगळवारी भरती असलेले काही उमेदवार रात्रीच सोलापुरात आले, त्यांची धर्मशाळेत गर्दी होती. रेल्वे स्थानकासमोरच्या धर्मशाळेत स्वच्छता नाही. स्वच्छता नसल्याने दुर्गंधीमध्ये त्यांना जेवण करावे लागत आहे. लाइटचीही व्यवस्था नसल्याने व दुर्गंधीमुळे जेवण केलं की, आम्ही झोपायला बाहेर जातो असं येथील भिकारी सांगत आहेत. काहीजण मद्यपान करत होते. इथं धर्मशाळा नाही फक्त भिकारी राहतात असं त्यांनीच सांगितलं. त्याप्रमाणे भिकारी पाहायला गेलो तेव्हा अंधारात काहीजण झोपलेले होते. मंगळवारी रात्रीसुद्धा तिथे अंधारच होता. 

म्हणून जागतो आम्ही... 
रेल्वेस्थानक परिसरात उत्तर प्रदेशातून आलेले काही वाटसरू सोमवारी मध्यरात्री स्थानकाबाहेर झोपले होते. तुम्ही धर्मशाळेत का गेला नाहीत, असं विचारलं तर आम्हाला धर्मशाळा कुठे आहे, हे माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. आमच्यातील काहीजण झोपले आहेत, चोरांपासून संरक्षण म्हणून आम्ही जागत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: marathi news solapur news sakal