वाळू माफीयांविरुध्द टाकलेल्या धाडीत बेरोजगार तरूण सापडले

हुकूम मुलाणी
मंगळवार, 13 मार्च 2018

मंगळवेढा (सोलापूर) : जिल्हा पथकाने वाळू माफीयाविरुध्द टाकलेल्या धाडीत सापडलेल्या आरोपीमध्ये वीशीतील तरुण सापडले. बेरोजगारीमुळे कमी काळात जास्त पैसे मिळू लागल्याने तरुणाईची पावले वाळू व्यवसायात गुंतू लागल्याचे दिसून आले. याच तरुणांच्या माध्यमातून प्रशासनानेही आपले हात धुवून घेतले असलेस, तरी कारवाईत मात्र वाहनधारक सापडले.

मंगळवेढा (सोलापूर) : जिल्हा पथकाने वाळू माफीयाविरुध्द टाकलेल्या धाडीत सापडलेल्या आरोपीमध्ये वीशीतील तरुण सापडले. बेरोजगारीमुळे कमी काळात जास्त पैसे मिळू लागल्याने तरुणाईची पावले वाळू व्यवसायात गुंतू लागल्याचे दिसून आले. याच तरुणांच्या माध्यमातून प्रशासनानेही आपले हात धुवून घेतले असलेस, तरी कारवाईत मात्र वाहनधारक सापडले.

दोन दिवसांपूर्वी तांडोर येथे जिल्हा पथकाने टाकलेल्या धाडीत 29 जणाविरुध्द गुन्हे दाखल झाले असून यातील काही फरार झाले सापडलेल्या 14 आरोपीला पोलीस कोठडी दिली असून उर्वरित आरोपीचा शोध घेण्याचा काम आता पोलीस समोर आहे. यापूर्वी सिध्दापूर येथेही मोठी कारवाई झाली. सोड्डी प्रकरणातील एक आरोपी सापडला असून अन्य आरोपीला शोधण्याचे काम सुरु असताना आता वाळू चोरीतील आरोपी शोधण्याचे आव्हान पोलीसांसमोर आहे. भिमा नदी काठचा भाग हा वाळू माफीयांसाठी पोषक असून नदीकाठच्या गावात वाळूसाठा करण्यासाठी जागा नसल्यामुळे काही गावात मंदिर परिसर व स्मशानभूमीतच वाळूचा साठा केल्याने अंत्यविधी करण्यास अडचणीचे ठरत आहे.

नदीकाठच्या सर्वच गावात वाळू उपशाला बंदी असताना महसूल प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे वाळू उपशाला जोर आला. बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूला बंदीमुळे दुप्पट दर मिळू लागल्याने या व्यवसायातच चांगले उत्पन्न मिळू लागल्याने अधिक लक्ष केंद्रीत केले. व्यवसायात अडकाठी ठरणाऱ्यावर दबावतंत्र देखील वापरले गेले. सिध्दापूरच्या महिला सरपंच याबाबत आंदोलन करावे लागले होते. या व्यवसायात अधिकाऱ्यांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी या तरुणाईचा वापर चौका चौकात करण्यात आला.

मोबाईलमुळे अधिकारी कधी येणार हे कळू लागले त्यामुळे वाळूची चोरी शक्य होत होती. यामध्ये नदीकाठच्या गावापासून सांगली कोल्हापूरला जाण्यासाठी ग्रामीण भागातील रस्ते खराब करुन टाकले रात्रीत मोठी माया मिळत असल्याने या व्यवसायात टॅक्ट्रर, जे.सी.बी ट्रकचा वापर करण्यात आला. स्थानिक पोलीसांकडूनही एक दोन वाहनांवर कारवाई करण्यात येत असली, तरी अर्थपूर्ण व्यवहारातुन वाहने सोडण्यात आल्याची चर्चा तांडोर कारवाईनंतर होऊ लागली. पण महसूल खात्याने अलिकडच्या तीन चार माहिन्यात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे वाळू माफीया अधिकच सुसाट झाले पण कारवाईत मात्र जवळच्या गावातील ट्रॅक्टर व जेसीबी सापडले कर्जात विळख्यात सापडल्यामुळे चार पैसे या व्यवसायात मिळून कर्जमुक्त होण्याच्या आशेवर असलेले वाहनधारक जिल्हा पथकांच्या नजरेतून मात्र सुटले नाहीत

Web Title: Marathi news solapur news Sand stems theft 20 years old