सुटीच्या दिवशीही गुरुजींची शाळा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

सोलापूर - पंचायत राज समिती सात ते नऊ फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे रविवारी सुटी असूनही जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना शाळेवर उपस्थित राहण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यात आज सुटीच्या दिवशीही गुरुजींची शाळा भरली होती.

पंचायत राज समिती, शाळा, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी यांना भेटी देऊन त्याची तपासणी करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळा त्रुटीमुक्त असावी, असा प्रयत्न शिक्षण विभागाने केला आहे. त्यासाठी सुटीच्या दिवशीही गुरुजींना शाळेमध्ये उपस्थित राहून पंचायत राज समिती दौऱ्याची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शाळेमध्ये गेलेल्या शिक्षकांनी आज शाळेतील दप्तर नीट लावणे, शाळा कपाट, फाइल व्यवस्थित ठेवणे, आर्थिक रेकॉर्ड अद्ययावत करणे, उपस्थिती भत्ता, शालेय पोषण आहार, शाळा अनुदान, शिक्षक व इतर बांधकाम अनुदान, शालेय स्वच्छता करणे, वर्ग, मैदान शौचालय, पाणीपुरवठा, अडगळीच्या फाइल्स व इतर सामानाची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी करणे यांसारखी कामे केली आहेत.

Web Title: marathi news solapur news school holiday teacher