प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिवाजी देशमुख झाले सीए

वसंत कांबळे
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

कुर्डु (सोलापूर) : शिराळ (माढा) येथील शिवाजी मारुती देशमुख यांने द इन्स्टिटय़ूट ऑफ काॅस्ट अकाऊंट आॅफ इंडिया(ICMAI) च्या वतीने डिसेंबर 2017 मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परिक्षेत प्रतिकूल परिस्थिती वर मात करुन यश मिळवून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. 

कुर्डु (सोलापूर) : शिराळ (माढा) येथील शिवाजी मारुती देशमुख यांने द इन्स्टिटय़ूट ऑफ काॅस्ट अकाऊंट आॅफ इंडिया(ICMAI) च्या वतीने डिसेंबर 2017 मध्ये घेण्यात आलेल्या अंतिम परिक्षेत प्रतिकूल परिस्थिती वर मात करुन यश मिळवून आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. 

घरात अठराविश्व दारिद्र्य दररोज दुसर्‍याच्या शेतात कामाला गेल्याशिवाय पोटाची खळगी भरणे अशक्य अशा परिस्थितीत आपल्या पोराला मोठा साहेब करायच ही स्वप्न उराशी बाळगून काबाडकष्ट करणाऱ्या शिराळ (माढा) येथील मारुती बाबुराव देशमुख व पत्नी नागरबाई मारुती देशमुख या दाम्पत्याचा मुलगा शिवाजी मारुती देशमुखने अखेर चार्टर्ड अकाऊंट परीक्षेत यश संपादन करुन आई वडीलांचे मोठा साहेब होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. 

 देशमुख यांना जोतिराम व शिवाजी नावाची दोन मुलं आहेत. यांना गावात स्वतःची एक गुंठा ही जमिन नाही. पण या अडचणी समोर ते कधीच झुकले नाहीत. मोठा भाऊ जोतिराम हा कंपनीत कामाला व आई वडील येथील सरपंच सुदर्शन टोणपे यांच्या शेतामध्ये कायम कामाला व शिवाजी ही गावाकडे आल्यावर कधी घरी बसला नाही व मित्रा सोबत मौज मजा केली नाही. परिस्थितीची जाण असणारा शिवाजी ही सुटीत गावाकडे आल्यावर आई वडिलां सोबत काम करुन आई वडीलांना मदत करुन परिस्थिती वर मात करत असे. पण परिस्थिती चे कधीही भांडवल केले नाही . 

शिवाजीचे दहावी पर्यंतचे शिक्षण आंतर भारती भाग शाळा कुर्डु येथे थर बारावी पर्यंतचे शिक्षण के. एन. भिसे कॉलेज मध्ये झाले व महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील शाहु काॅलेज येथे घेतले आहे. त्याला या शिक्षणासाठी चार्टर्ड अकाऊंट सचिन घायाळ, प्रवीण साळुंखे, प्रा. डाॅ. सचिन लोंढे, प्रा. सचिन नरखेडकर, लक्ष्मण बारबोले मेजर यांचे मार्गदर्शन लाभले. 

या यशाबद्दल सरपंच सुदर्शन टोणपे, सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानदेव टोणपे, दिलीप टोणपे, चंद्रकांत टोणपे, बिनु काका ढवळे, अक्षय टोणपे, प्रविण टोणपे, सतिश टोणपे, यांनी अभिनंदन केले. या यशाबद्दल आई, वडील, शिवाजी व त्यांच्या कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: Marathi news solapur news shivaji deshmukh becomes CA in bad conditions