मंगळवेढा आगार अजूनही शिवशाही बसच्या प्रतिक्षेत 

हुकूम मुलाणी
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

मंगळवेढा : राज्यात संतांची नगरी म्हणून परिचित असलेल्या मंगळवेढा आगारात अजूनही शिवशाही बस आल्या नसल्यामुळे प्रवासी अजूनही या बसच्या प्रतिक्षेत आहेत. पण महामंडळाचे अधिकारी लक्ष देणार असा सवाल प्रवासी वर्गातून विचारला जात आहे. 

मंगळवेढा : राज्यात संतांची नगरी म्हणून परिचित असलेल्या मंगळवेढा आगारात अजूनही शिवशाही बस आल्या नसल्यामुळे प्रवासी अजूनही या बसच्या प्रतिक्षेत आहेत. पण महामंडळाचे अधिकारी लक्ष देणार असा सवाल प्रवासी वर्गातून विचारला जात आहे. 

सध्या महामंडळाच्या सेवेपेक्षा खासगी वाहतूक करणारे कमी दरात आणि जाण्याच्या ठिकाणी वेळेवर नेत असल्याने प्रवासी खासगी वाहतूकीकडे आकर्षित होते. ही वाहतुक धोकादायक असली तरी वेळेवर पोहोचण्यासाठी प्रवासी आपला जीव धोक्यात घालत आहेत. एस.टी.पासून कमी झालेला प्रवासी पुन्हा  महामंडळाच्या सेवेकडे आकर्षित करण्यासाठी शिवशाही ही वातानुकूलित बस आणली. या बसेसकडे प्रवासाचा ओढा वाढत आहे. तालुक्यात मात्र या सेवेचा आनंद घेता येत नाही. तालुक्यातील रस्ते खराब झाले असून त्यामुळे एस.टी बसेसचे नुकसान होत आहे. 

सिध्दापूर मार्गावर लांब पल्ल्यामुळे जादा तिकीटाचा भार प्रवाश्यांना सोसावा लागत असल्याने प्रवासी खासगी वाहतुकीकडे जात आहे. पंचायत सभापती प्रदीप खांडेकर यांचे हिवरगाव अजूनही एसटीच्या प्रतिक्षेत सोलापूर मार्गांवर तर गतीरोधकाचे धक्के खाऊन प्रवाशी पुन्हा एस.टी च्या सेवेत येण्याची मानसिकता होत नाही. मंगळवेढा हैदराबाद ही बस सोलापूर येथे नोकरी करणाऱ्यांसाठी फायदेशीर होती पण ती बस सध्या बंद आहे. मंगळवेढा-मुंबई ही लांब पल्याची बस बंद झाल्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे या ठिकाणी रात्री आठ वाजता जाणारे प्रवासी आता खासगी व वाहतुकीकडे गेले. सकाळी 6 वा. सुटणारी पंढरपूर-विजापूर बसवनबागेवाडी ही मंगळवेढा चिक्कलगी जाडर बबलाद संख वरून जाणारी कर्नाटक महामंडळाची बस बंद झाल्याने या मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होत असून मंगळवेढा व पंढरपूर आगाराने या भागातील प्रवाशांची गैरसोय बंद करावी अशी मागणी होत आहे.

पंढरपूरहून मंगळवेढ्याला येणेसाठी रात्री सहा ते आठपर्यंत बस नाही. एकूणात एसटी सेवा प्रवाशांना समाधानकारक नाही. परिवहन राज्य मंत्री जिल्ह्यातील असताना येथील प्रवाशांना चांगल्या व वेळवर आणि सुरक्षित प्रवासासाठी एसटीची प्रतिक्षा करावी लागते. याबाबत तालुक्यातील प्रवाशांमधून नाराजी सुर निघू लागला. 

सोलापूर विभागात नवीन बसेस येणार असून याबाबत सर्वेक्षण झाले असून दोन बसेसची मागणी करण्यात आली. लवकरच दोन मिळतील, असे आगार व्यवस्थापक मधुरा जाधवर यांनी सांगितले. एसटी महामंडळाने प्रवासाचा त्रास कमी करावा. बंद मार्गावरील बससेवा वेळेवर सोडल्यास प्रवासी परत येऊ शकतात याबाबत पत्रव्यवहारही केला तरीही अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत तसेच शिवशाही बस देण्याबाबतही परिवहन राज्यमंत्री जिल्ह्यातील असताना विलंब ही खेदाची बाब आहे, असे मत आ. भारत भालके यांनी व्यक्त केली. 

 

Web Title: Marathi news solapur news shivshahi bus