देवीदास घोडके 'सिद्धेश्वर केसरी' चषकाचा मानकरी

दावल इनामदार
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

माचणुर (सोलापूर) : येथील महाशिरात्री निमित्त श्री सिद्धेश्वर यात्रा समितीने आयोजित केलेल्या सिद्धेश्वर केसरी चषक कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमाकांची कुस्ती देवीदास घोड़के याने लपेट या डावावर बेनापुरचा जालिंधर मारगुडेला दहा मिनीटांत चितपट करुन जिंकली.

माचणुर (सोलापूर) : येथील महाशिरात्री निमित्त श्री सिद्धेश्वर यात्रा समितीने आयोजित केलेल्या सिद्धेश्वर केसरी चषक कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमाकांची कुस्ती देवीदास घोड़के याने लपेट या डावावर बेनापुरचा जालिंधर मारगुडेला दहा मिनीटांत चितपट करुन जिंकली.

गुरुवारी (ता. 15) दुपारी दोन वाजता कुस्ती फडाच्या तानाजी खरात यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यात्रा समितीतर्फे देवीदास घोड़के एक लाख रुपयांचे पारितोषिक आणि सिद्धेश्वर चषक देण्यात आला. यावेळी मोठ्या संखेने कुस्ती शौकीन, अनेक मल्ल व कुस्ती क्षेत्रातील नामवंत मार्गदर्शक उपस्थित होते. प्रथम क्रमाकांच्या अटीतटीच्या लडतीस कुस्तीला सुरुवात होतास बारीक नजरा करुन मैदान परिसरात शांतता पसरली होती. माचणुर येथील सिद्धेश्वर कुस्ती आखाड्यात द्वितीय क्रमांकाची कुस्ती 75 हजारांची विकास धोत्रे व दादु मुलाणी यांची कुस्ती जोड़ीवर सोडण्यात आली. तृतीय क्रमांकाची 51 हजारांची कुस्ती सिद्धनाथ ओमणे यांनी काही मिनीटात घुटना डावावर शंकर माने याला चितपट केले.

या मैदानात माळशिरस, अकलूज, कुर्डवाडी, सोलापूर, खवासपुर, मंगळवेढा, मोहोळ, आटपाडी, कोल्हापुर, इंदापूर, पंढरपुर या ठिकाणच्या व्यायामशाळेतील मल्लाचा सहभाग होता. मल्लखांबमधे डिकसळ येथील अथर्व देशमुख लहान मुलाने उत्कृष्ट प्रात्यक्षिके सादर केली होती. कुस्ती मैदानाचे नियोजन केल्यामुळे यांच्याकडून सुनील डोके यांचा कुस्ती मैदानात सत्कार करण्यात आला. खासदार विजयसिंह मोहिते पाटील व आमदार भारत भालके यांचा सत्कार यात्रा समितीचे अध्यक्ष सुनील डोके, धनंजय गायकवाड़  यांच्या हस्ते करण्यात आला.

मैदानात 300 हुन अधिक कुस्त्या झाल्या. रात्री उशीर पर्यंत मैदानमधे कुसत्या चालल्या होत्या त्याला कुस्तीशौकिनांनी गर्दी केली होती. उत्कृष्ट कुस्ती निवेदक म्हणून धनाजी मदने, दिलीप बिनवडे यांनी काम पाहिले. यावेळी यात्रा समितीचे अध्यक्ष सुनील डोके, सरपंच सुनील पाटील, धनंजय गायकवाड, पंडित डोके, बबन सरवले, आबासो डोके, विठ्ठल डोके, लड़िक डोके, आबासो मेटकरी, विष्णुपंत डोके, संजय शिंदे, पै.महेंद्र देवकते, पै. भरत मेकाले, राजेन्द्र ओमने, एकनाथ बेदरे, मारुती वाकडे, रावसाहेब डोके, भाऊसाहेब पवार, पै. असलम काझी, पै.मारुती माळी, पै.सत्यवान घोडके, भारत शिवशरण, सचिन कलुबर्मे, महादेव फ़राटे, दत्तात्रय डोके, धनंजय मुळे, नितिन सरवले, जनार्धन शिवशरण, शिवाजी डोके, सुभाष डोके, प्रमोद पवार, एकनाथ डोके, राजीव बाबर, कल्ल्याण डोके, सुखदेव कलुबर्मे, महादेव डोके, कुमार सरवले, दिलीप शिवशरण, एकनाथ बेदरे, जयंत पवार, रजाक निगेवान, शंकर सरवाले, अतुल डोके, तुकाराम डोके, संभाजी डोके, सिद्धेश्वर कलुबरमे, सुधीर मुळे, रमेश डोके, विजय कलुबर्मे, सुनील नांदे, दिलीप कलुबर्मे, बालकृष्ण कलुबर्मे, सुयश गायकवाड़,धनाजी बेदरे, विनायक गवळी, संतोष डोके, सोमनाथ नांदे, आप्पासो कलुबर्मे आदि उपस्थित होते.

Web Title: Marathi news solapur news siddheshwar kesari wins devidas ghodke