डॉक्टर दाम्पत्याने स्वीकारले शेतकऱ्याच्या मुलाचे पालकत्व

राजकुमार शहा 
सोमवार, 5 मार्च 2018

मोहोळ येथील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या स्मीता पाटील या कवयीत्री आहेत, तर चांगल्या साहित्यिक आहेत त्यांचे पती शहरातील नामवंत डॉक्टर आहेत. समाजाने आपणास काय दिले. या पेक्षा समाजासाठी आपण काय केले, या धर्तीवर त्यांचे समाजकार्य सुरू आहे. आर्थिक सुबता असलेल्या या दांपत्याचा सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग असतो.

मोहोळ : समाजात आज कितीही गरीब वा श्रीमंत असला तरी प्रत्येकाचा उद्देश हा पैसा मिळविणे हा आहे. गरीब दोन वेळच्या हातातोंडाची गाठ पडावी यासाठी पैसा मिळवितात. तर उच्चभ्रु पुढच्या पिढयांच्या ऐश आरामासाठी पैसे मिळवतात. मात्र मोहोळ येथील डॉ. स्मिता व डॉ. प्रमोद पाटील हे दांपत्य त्यास अपवाद आहे. त्यांनी मोहोळ येथील गायकवाड वस्ती वरील आत्महत्या ग्रस्त शेतकरी संजय बबन गायकवाड यांच्या दोन मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारुन समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. पैसा हेच सर्वस्व नसल्याचे त्यांनी दाखवुन दिले आहे.

मोहोळ येथील व्यवसायाने डॉक्टर असलेल्या स्मीता पाटील या कवयीत्री आहेत, तर चांगल्या साहित्यिक आहेत त्यांचे पती शहरातील नामवंत डॉक्टर आहेत. समाजाने आपणास काय दिले. या पेक्षा समाजासाठी आपण काय केले, या धर्तीवर त्यांचे समाजकार्य सुरू आहे. आर्थिक सुबता असलेल्या या दांपत्याचा सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग असतो. त्यांच्याशी संवाद साधल्यावर मिळालेली माहिती अशी, की आलीकडच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. दररोज वृतपत्रातील या बाबतीत त्या बातम्या वाचुन मन सुन्न व्हायचे. कवयित्री असल्याने त्यांनी शेतकरी आत्महतेवर अनेक कविता केल्या. पण नुसत्या कविता करून भागणार नाही. तर आपण एखादयाला खरोखर मदत केली पाहिजे. हा विचार मनात आला आणि त्याची अंमलबजावणी केली. 

मोहोळ येथील गायकवाड वस्तीवर राहणारे शेतकरी संजय बबन गायकवाड या शेतकऱ्याने नैराश्येतुन कांही दिवसापुर्वी आत्महत्या केली आहे. अगोदरच घरची परिस्थिती अडचणीची राहायला घर नाही, त्यात स्वप्नील व संध्या ही दोघ बहीण भाऊ शहरातील नेताजी प्रशालेत शिक्षण  घेतात संजयच्या आत्महत्येमुळे कुटुंब  उघड्यावर पडले मुलांची शिक्षणाची अडचण झाली हीच अडचण ओळखुन डॉक्टर दांपत्यानी त्या दोघा बहिण भावाचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले त्यांना बारावी पर्यंत लागणारा शालेय गणवेश व अन्य शैक्षणिक साहीत्य व इतर खर्चाची त्यांना मोफत सुवीधा दिली आहे त्यामुळे दोघा बहीण भावाला मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना कीतीही अडचणी आल्या तर त्यांना आत्महत्या करू नयेत किंवा तसा विचार ही त्यांच्या मनात येवु नये हीच त्या पालकत्वा मागची भुमिका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Marathi news Solapur news social