इंदापूरमध्ये दोन गटांत हाणामारी; २४ जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

भिगवण : माहिती अधिकारात माहिती मागविल्याचा व मागील भांडणाचा राग मनात धरुन पिंपळे(ता.इंदापुर) येथे दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीमध्ये दोन्ही गटाचे २४ जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी एकमेकांविरुध्द दाखल केलेल्या फिर्यादीनुसार ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी(ता.१०) सकाळीच घडलेल्या या प्रकारामुळे पिंपळे गावांमध्ये तणावाचे वातावरण होते.

भिगवण : माहिती अधिकारात माहिती मागविल्याचा व मागील भांडणाचा राग मनात धरुन पिंपळे(ता.इंदापुर) येथे दोन गटांमध्ये झालेल्या मारहाणीमध्ये दोन्ही गटाचे २४ जण जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी एकमेकांविरुध्द दाखल केलेल्या फिर्यादीनुसार ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी(ता.१०) सकाळीच घडलेल्या या प्रकारामुळे पिंपळे गावांमध्ये तणावाचे वातावरण होते.

दिलीप तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिलीप आनंदा तांबे, पंढरीनाथ दिलीप तांबे, बलभीम दिलीप तांबे, तानाजी लक्ष्मण जाधव, संभाजी लक्ष्मण जाधव,शिवाजी रामचंद्र जाधव, रामचंद्र मोहन जाधव, प्रशांत ज्ञानदेव चोरमले, भागवत रामचंद्र जाधव, गणेश हरिभाऊ चोरमले,विजय शहाजी चोरमले, योगेश जालिंदर चोरमले, संदीप शिवाजी चोरमले (रा. सर्व पिंपळे,ता.इंदापुर) हे मारहाणीमध्ये जखमी झाले आहेत.

या प्रकरणी छत्रपती सहकारी साखर काऱखान्याचे संचालक अनिल बबन बागल यांचेसह दिपक बबन बागल, संदीप बबन बागल, हनुमंत दिनकर बागल, उमेश परशुराम बागल, संतोष परशुराम बागल, अशोक दिनकर बागल, संकेत पोपट बागल व इतर दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

तांबे यांचे फिर्यादीनुसार बुधवारी (ता.१०) सकाळी सातच्या सुमारास दिपक बबन बागल व इतरांनी त्यांचे घरी येऊन माहिती अधिकाराच्या अर्जावर का सह्या केल्या असा जाब विचारत शिवीगाळ व काठीने मारहाण केली. त्यांनी मंदिराजवळ उभे असलेल्या इतरांनाही काठीने मारहाण केली.

संकेत बागल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विरोधी गटांने केलेल्या मारहाणीमध्ये उमेश परशुराम बागल, सुनिल बबन बागल, अनिल बबन बागल, बाळासाहेब उत्तम बागल, दिपक बबन बागल, अशोक दिनकर बागल, विलास नामदेव बागल, हनुमंत दिनकर बागल, प्रशांत विलास बागल, रणजित देविदास बागल (रा. सर्व पिंपळे,ता.इंदापुर) जखमी झाले आहेत.

या प्रकरणी निलेश ऊर्फ संभाजी लक्ष्मण जाधव, नामदेव ज्ञानदेव चोरमले, भागवत रामचंद्र जाधव, तानाजी लक्ष्मण जाधव, योगेश जालिंदर चोरमले, गणेश शिवाजी चोरमले, बलराम दिलीप तांबे, पंढऱीनाथ दिलीप तांबे, राजेंद्र शहाजी चोरमले, विजय शहाजी चोरमले (रा. सर्व पिंपळे,ता.इंदापुर) व इतर अकरा जणांवर विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत बागल यांचे फिर्यादीनुसार यातील आरोपींनी मंगळवारी (ता.०९) सायंकाळी झालेल्या शाब्दिक चकमकीचा राग मनात धरुन बुधवारी (ता.१०) सकाळी मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली आहे.

या प्रकरणी दोन्ही गटांतील आरोपींवर बेकायदा जमाव जमवुन मारहाण करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार धनंजय राऊत, एन.एस. कदम व अनिल सातपुते करीत आहेत. 

Web Title: marathi news Solapur News Solapur Crime

टॅग्स