सोलापूर: पत्नीचा खून करून वृद्धाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

सोलापूर : विडी घरकुल येथे ज्येष्ठ नागरिकाने पत्नीच्या आजाराला
कंटाळून तिचा खून करून स्वतः: घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या
केली. हा प्रकार गुरुवारी (ता.15) रात्री नऊ ते शुक्रवारी (ता.16) सकाळी
सहाच्या दरम्यान घडला.

गोदूताई परुळेकर विडी घरकूल येथे सुदर्शन योगय्या पोटाबत्ती (वय 65)व
त्यांची पत्नी अंबूबाई सुदर्शन पोटाबत्ती (55) हे दोघे शुक्रवारी मृतावस्थेत दिसून आले.

सुदर्शन पोटाबत्ती यांनी पत्नीचा आजाराला कंटाळून तिच्या डोक्‍यात फरशी घातली. त्यानंतर स्वतः: पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शुक्रवारी सहा वाजता पोटाबत्ती यांच्या शेजाऱ्यांना कळाल्यानंतर त्यांनी पोलीसांना संपर्क केला. पोलिसांनी घटनास्थळी आले असता सुदर्शन पोटाबत्ती यांनी आत्महत्या केल्याचे दिसून आले. तर त्यांच्या पत्नी पलंगावर मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी खिडकीमधून दरवाजापर्यंत काठी घालून घराची कडी उघडली.

अंबूबाई पोटाबत्ती या बारा वर्षापासून आजारी होत्या. त्यांना चालताही येत नव्हते. त्यांची सुशुश्रा हे त्यांचे पतीच करायचे. मागील तीन महिन्यांपासून ते विडी घरकुल येथे राहात होते. सुदर्शन पोटाबत्ती यांचा मुलगा, सून व नातवंडे हे सोलापुरात असून ते शहरात राहतात. या घटनेची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Web Title: marathi news solapur news Solapur crime news