सोलापूर महापालिकेत सहकारमंत्री गटाला चपराक 

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 1 मार्च 2018

सोलापूर : महापालिकेच्या राजकारणात पालकमंत्री विजय देशमुख यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना चपराक दिली असून, स्थायी समिती सभापतीच्या उमेदवारीसह सभागृहनेतेपदही स्वतःच्या गटाकडे खेचून घेतले आहे.

सोलापूर : महापालिकेच्या राजकारणात पालकमंत्री विजय देशमुख यांनी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना चपराक दिली असून, स्थायी समिती सभापतीच्या उमेदवारीसह सभागृहनेतेपदही स्वतःच्या गटाकडे खेचून घेतले आहे.

स्थायी समितीमध्ये सहकारमंत्री गटाचे सहा तर पालकमंत्री गटाचे दोन सदस्य आहेत. सभापतीपद पालकमंत्री गटाला गेले तर सभागृहनेतेपद सहकारमंत्री गटाला मिळेल अशी चर्चा होती. मात्र ही दोन्ही पदे पालकमंत्री गटाकडे गेली आहेत. स्थायी समितीचे मावळते सभापती संजय कोळी यांची पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्याची घोषणा शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनीच काही वेळापूर्वी घोषणा केल्याने कोळी यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आणि सहकारमंत्री गट सभागृहनेतेपदाच्या शर्यतीतून आपोआप बाहेर पडला आहे. 

सहकारमंत्री गटाकडून सभापतीपदासाठी श्रीनिवास करली आणि सभागृहनेतेपदासाठी नागेश वल्याळ यांच्या नावाची चर्चा होती. मात्र वल्याळ यांच्याऐवजी कोळी यांनी बाजी मारली. करली ऐवजी कणके यांना उमेदवारी मिळाल्याने ही दोन्ही पदे मिळवण्यात पालकमंत्री गटाची सरशी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सहकारमंत्री गटाची सभापती निवडणुकीत काय भूमिका असणार हे शनिवारीच (ता.तीन) स्पष्ट होणार आहे. 

Web Title: Marathi news solapur news subhash deshmukh municipal corporation