17 वर्षांत 14 हजार रुग्ण क्षयमुक्त 

TB
TB

सोलापूर : डॉट्‌स उपचारपद्धतीचा वापर करून गेल्या 17 वर्षांत 14 हजार 209 रुग्ण क्षयमुक्त झाले आहेत. क्षयमुक्त भारत, हे यंदाच्या वर्षीचे घोषवाक्‍य आहे. 2025 पर्यंत संपूर्ण भारत क्षयमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 

क्षयरोग समूळ नष्ट करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने विविध उपक्रम सुरू करण्यात आले. त्याअंतर्गत 7 जानेवारी 2002 पासून डॉट्‌स उपचारपद्धती अमलात आणली. या उपचारपद्धतीचा फायदा चांगला झाला. कर्मचाऱ्याच्या समोर रुग्णाला औषधोपचार घ्यावा लागतो. त्यामुळे रुग्ण बरा होण्यास मदत होते, असे शहर क्षयरोग अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी सांगितले. 

क्षयरोगाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार महिन्यातून केवळ चार वेळा गोळ्या देत होते. त्या गोळ्या रुग्णाच्या हातात देऊन, प्रत्यक्ष रुग्णाला वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर खाण्याची सक्ती केली जात असे. या पद्धतीमुळे क्षयरोग नियंत्रणात राहण्याऐवजी वाढण्याचा धोका बळावला. हे पाहता, केंद्राने राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयांत क्षयरोगावरील उपचारासाठी देण्यात येणाऱ्या डॉट्‌स गोळ्या आता दररोज देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या क्षयरोग विभागातून दररोज डॉट्‌सच्या गोळ्या देण्यात येत आहेत. 

क्षयरोगाचे अचूक निदान अर्ध्या तासात होऊ शकते, अशी यंत्रणा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे क्षयरोगावर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी फायदा होतो. क्षयमुक्तीसाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. 
- डॉ. मंजिरी कुलकर्णी, शहर क्षयरोग निर्मूलन अधिकारी 

आकडे बोलतात... 
कालावधी ः 17 वर्षे 
एकूण रुग्ण ः 18,766 
क्षयमुक्त रुग्ण ः 14,209 
उपचार सुरू असलेले रुग्ण ः 387 
मृत्यू झालेले रुग्ण ः 1508 
अर्धवट उपचार सोडलेले ः 1928 
औषधोपचाराला दाद न देणारे रुग्ण ः 291 
बदली होऊन गेलेले रुग्ण ः 344 
अंतिम टप्पा गाठलेले रुग्ण ः 99

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com