तंत्रनिकेतनमधील शिक्षकांचे वेतन वेळेवर न दिल्यास कारवाई

शीतलकुमार कांबळे
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

कॉलेज चालवावे कसे...?
बरीचशी तंत्रनिकेतन महाविद्यालये ही शिष्यवृत्ती किंवा ईबीसी यातून मिळणाऱ्या पैशावर चालत असतात. पूर्ण शुल्क भरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. यामुळे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर पैसै कमी असतात. अशावेळी शिष्यवृत्तीची वाट पहावी लागते. शासनाकडून शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. तसेच ईबीसीचा लाभ घेणारे विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत दिली जाते. त्यांचे शुल्क हे शासन भरते. हे शुल्क महाविद्यालयांना वर्षाच्या अखेरीस मिळते. यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिष्यवृत्ती आल्यानंतर वेतन देणे, किंवा कमी वेतन देणे असे प्रकार घडतात. असेच घडत असल्यास महाविद्यालय चालवावे कसे असे एका तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांनी सांगितले.

सोलापूर : राज्यातील तंत्रशिक्षण महाविद्यालयात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर भत्ते वेळेवर न देणे किंवा कमी देणे असे प्रकार सर्रास घडत आहेत. या पार्श्‍वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या संस्थेविरोधात कारवाई करण्यात येईल., अशी तंबी राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने दिली आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयात काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्‍न ताजा असतानाच तंत्रनिकेतनमध्येही असे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे तक्रार केल्या होत्या. याची गंभीर दखल घेऊन राज्यातील सर्व तंत्रनिकेतन महाविद्यालयांना वेतन व इतर भत्ते योग्य प्रमाणात व वेळेवर देण्याचे सांगण्यात ओल आहे.

एआयसीटीईच्या ऍप्रुव्ह हॅंडबूकमध्ये (2018-19) प्रकरण 6.4 या तरतुदीनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर भत्ते योग्य प्रमाणात व वेळेवर देणे क्रमप्राप्त आहे. व्यावसायिक विनाअनुदानित पदविका अभ्यासक्रम संस्थेमध्ये वेतन नियमित प्रदान न करण्याच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्यास एआयसीटीई व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्यातर्फे कारवाई करण्यात येणार आहे.

कॉलेज चालवावे कसे...?
बरीचशी तंत्रनिकेतन महाविद्यालये ही शिष्यवृत्ती किंवा ईबीसी यातून मिळणाऱ्या पैशावर चालत असतात. पूर्ण शुल्क भरून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. यामुळे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर पैसै कमी असतात. अशावेळी शिष्यवृत्तीची वाट पहावी लागते. शासनाकडून शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही. तसेच ईबीसीचा लाभ घेणारे विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत दिली जाते. त्यांचे शुल्क हे शासन भरते. हे शुल्क महाविद्यालयांना वर्षाच्या अखेरीस मिळते. यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिष्यवृत्ती आल्यानंतर वेतन देणे, किंवा कमी वेतन देणे असे प्रकार घडतात. असेच घडत असल्यास महाविद्यालय चालवावे कसे असे एका तंत्रनिकेतनच्या प्राचार्यांनी सांगितले.

Web Title: Marathi news Solapur news teachers salary