कुर्डुवाडी: तीन घरांसह गॅस एजन्सीमध्ये चोरी

विजयकुमार कन्हेरे
रविवार, 7 जानेवारी 2018

निलांबर गॅस एजन्सीमध्ये खिडकिचे गज तोडून आत प्रवेश केला. परंतू चोरीस काही गेले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. गॅस दुकानाच्या सीसीटीव्हीत चोरटा कैद झाला असून कुर्डुवाडी पोलिसांनी घटना स्थळांची पाहणी केली.

कुर्डुवाडी : शहरातील माढा रस्त्यावरील जिजाऊनगर या वसाहतीतील तीन बंद घरे व गॅसचे एजन्सीचे आॅफिस रात्रीतून अज्ञात चोरट्याने फोडले. या घरफोड्यामध्ये चोरट्यांना कसलाही ऐवज मिळाला नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आज (रविवार) पहाटे दोन ते तीनच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये  हरी कारंजकर, दरगुडे व घेवरचंद बांठिया यांची घरे फोडण्यात आली. यांच्या बंद घराचा कडिकोयंडा तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. बांठिया यांच्या घरात सध्या कोणीही राहत नाही. कारंजकर व दरगुडे यांचे कुटुंबीय परगावी गेले असल्यामुळे यांचा किती ऐवज चोरीला गेला, हे अद्याप समजू शकले नाही.

निलांबर गॅस एजन्सीमध्ये खिडकिचे गज तोडून आत प्रवेश केला. परंतू चोरीस काही गेले नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. गॅस दुकानाच्या सीसीटीव्हीत चोरटा कैद झाला असून कुर्डुवाडी पोलिसांनी घटना स्थळांची पाहणी केली.

Web Title: Marathi news Solapur news thief in Kurduwadi