मुख्यमंत्रीजी.. लोकवस्तीमधील वाईन शॉपी बंद करा! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

कोणार्क नगर परिसरातील नागरिकांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा आपल्या तक्रारीचे निवेदन पाठविले आहे. वाईन शॉपीमुळे नागरिकांना त्रास होत आहे. शासनाकडे याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. आम्ही पुढील आठवड्यात पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरविणार आहोत. 
- ए.एस.वाघमारे, रहिवासी, कोणार्क नगर

सोलापूर : जुळे सोलापुरातील कोणार्क नगर येथील लोकवस्तीच्या परिसरातील वाईन शॉपी बंद व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापासून अनेक ठिकाणी तक्रार करूनही परिणाम होत नसल्याने या परिसरातील नागरिक आता पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा पाठविण्यात आले आहे. 

कोणार्क नगर, विजय नगर, श्रीकांत नगर, वसंत नगर, विशाल नगर हा परिसरात लोकवस्तीचा आहे. याठिकाणी विविध शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बॅंका, सुपर बझार आहेत. कोणार्क नगर येथे गेल्या वर्षी एक वाईन शॉपी सुरु करण्यात आली. या वाईन शॉपीमुळे परिसरात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. ही वाईन शॉपी रात्री दहानंतरही चालू असते. मद्यपि लोकांचा त्रास नागरिकांना होत आहे. महिलांच्या छेडछाडीच्या घटनाही घडल्या आहेत. ही वाईन शॉपी बंद व्हावी यासाठी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आहे, मात्र अद्याप परिणाम झाला नाही. 

कोणार्क नगर परिसरातील नागरिकांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा आपल्या तक्रारीचे निवेदन पाठविले आहे. वाईन शॉपीमुळे नागरिकांना त्रास होत आहे. शासनाकडे याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. आम्ही पुढील आठवड्यात पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा ठरविणार आहोत. 
- ए.एस.वाघमारे, रहिवासी, कोणार्क नगर

Web Title: Marathi news Solapur news wine shop in solapur