बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला

हरिभाऊ दिघे 
शुक्रवार, 9 मार्च 2018

तळेगाव दिघे (नगर) : सिन्नर (नाशिक) तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथून घरातून बेपत्ता झालेल्या एका ५८ वर्षीय महिलेचा मृतदेह संगमनेर (नगर) तालुक्यातील सायखिंडी शिवारात आढळून आला. चहाबाई पुंजा चिने (वय ५८) असे या महिलेचे नाव आहे.

बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना उघडकीस आली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिन्नर तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील चहाबाई पुंजा चिने ही महिला काहीही न सांगता मंगळवार ( ता. ६ ) सकाळी आठ वाजेपासून घरातून बेपत्ता झालेली होती. नातेवाईकांकडून तिचा शोध घेतला जात होता.

दरम्यान सायखिंडी शिवारात बुधवारी सायंकाळी पाचवाजेच्या सुमारास चहाबाई चिने हिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथे हलविला. योगेश पुंजा चिने  (रा. पाथरे बुद्रुक ता. सिन्नर) यांनी पोलिसांत खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या महिलेच्या मृत्यूचे निश्चित कारण समजू शकले नाही. पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार मोहंमद खान अधिक तपास करीत आहे.

Web Title: Marathi news solapur news woman dead body