युवा शेतकऱ्याने यशस्वीपणे फुलवली डाळींबाची बाग

Pomegranate
Pomegranate

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : शेतीत राम राहिला नाही असे म्हणणार्‍या बेरोजगार युवकांनी माढा तालुक्यातील उपळाई बुद्रूक येथील युवा शेतकरी संदिप जगन्नाथ गोरे यांच्या शेतीला आवर्जून भेट द्यावी. मेहनत, नियोजनाला तंत्रज्ञानाची जोड या त्रिसुत्रीतून गोरे यांची तीन एकरात डाळींबाची बाग बहरली आहे. बाजारपेठेचा कानोसा घेत १३ लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळवले आहे. सद्यस्थितीला डाळींबाच्या दर घसरले असताना देखील डाळींबांच्या बागेतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळल्याने गोरे कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. 

उच्चशिक्षीत तरूण शेतकरी संदिप गोरे यांनी नोकरीची अपेक्षा न करता डाळींबशेती यशस्वी केली आहे. गोरे यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण होताच कुठेही नोकरीसाठी न धडपडता घरी असलेल्या शेतीकडे लक्ष दिले. तीन एकर क्षेत्रात त्यांनी ८५० झाडांची लागवड केली. वडिलोपर्जित त्यांना 80 एकर जमीन आहे. संदिप गोरे यांचे वडील आजतागायत या शेतातून गहू, ज्वारी, हरभरा अशीच पिके घेत असत. परंतु संदिप गोरे यांनी स्वतः शेतीत लक्ष देत डाळींबांच्या बागेची लागवड करत डाळींब पिकांच्या अभ्यासाला सुरुवात केली. चर्चासत्रे, माहितीपुस्तके, यशस्वी बाग व शेतकऱ्यांच्या भेटी व डांळीब पिकांची माहिती घेत बाग यशस्वी केली.

उपळाई बुद्रूक हा भाग पाण्यापासून वंचित परंतु गोरे यांनी पाण्याची योग्य व्यवस्था व नियोजन करून बोअर व विहिरीच्या पाण्यावर बाग फुलवली. डाळींबांची लागवड केल्यानंतर प्रथम त्यांना अनेकदा तोटाही सहन करावा लागला. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. डाळींबांचे मिळालेले ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव यांच्या जोरावर गोरे यांनी झाडांची संख्या वाढवली. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, नियमीत फवारणी, योग्य वेळी योग्य पद्धतीने झाडांची छाटणी या नियोजनमुळे डाळींबशेती मोठ्या प्रमाणात यशस्वी केली आहे. बागेचे बारकाईने निरीक्षण असल्याने कोणत्याही रोगचा प्रादुर्भाव होऊ शकला नाही. त्यामुळे सध्या त्यांच्या डाळींबांची विक्री नेपाळच्या काठमांडू बाजारपेठेत होत आहे. युवा शेतकरी संदिप गोरे यांना डांळीब शेती यशस्वी करण्यासाठी उपळाई बुद्रूकचे सरपंच मनोहर गायकवाड व सुधीर गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. वडिलोपर्जित ८० एकर जमीन असुन वडिल मका, गहू अशी पिके घेत असत परंतु मी या सर्व गोष्टींना फाटा देत डाळींब पिकांची लागवड केली. वेगवेगळ्या व यशस्वी डाळींब बागयतदार शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन तशा प्रकारे शेती करण्याचा प्रयत्न केला. यात मला माझा वडिल भाऊ अक्षय गोरे यांचेही सहकार्य मिळाले आहे, अशी भावना संदिप यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com