मंगळवेढा: पोलिसांच्या आश्वासनानंतर युवकावर अंत्यसंस्कार

हुकूम मुलाणी
रविवार, 14 जानेवारी 2018

सांगोलकर कुटुंबाचा उदरनिर्वाह हा माणिक वरच चालत असल्याने त्यांच्या मृतूने त्याच्या कुटुंबाचा आधारवड गेल्याने कुटुंबाचा आभाळ कोसळले. आज रड्डेे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास योग्य केेेला जाईल प्रेत ताब्यात घेण्याची विनंती नातेवाईकांना केली.

मंगळवेढा : भोसे येथील इंग्लिश स्कूल या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपल्यानंतर रात्री घरी येत असताना अज्ञात कारणावरून संशयास्पद मृत्यू झालेल्या रड्डे येथील माणिक नारायण सांगोलकर (वय 20) याच्या मृत कारणाचा तपास लावण्यात यावा मागणीसाठी रड्डे गावातील सर्व दुकाने बंद ठेवत ग्रामस्थांनी जिल्हा पोलिस प्रमुख विरेश प्रभु यांना निवेदन देत मृतदेह ताब्यात घेण्यास दुपारपर्यंत नातेवाईकांनी नकार दिला होता. आरोपीच्या अटकेचे आश्वासन नातेवाईकांना दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला रात्री आठच्या दरम्यान शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबतचे निवेदन उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप जगदाळे व पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांना देण्यात आले असून ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत पोलिस स्टेशनला धाव घेत खुनाचा संशय व्यक्त केला असून आरोपीच्या अटकेची मागणी पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्याकडे काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश कोळेकर, तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष युवराज कांबळे व ग्रामस्थानी केली. रड्डे-भोसे रोडवरील बाळकृष्ण हॉटेल शेजारील विहिरीत माणिक सांगोलकर यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. गुरूवारी रात्री दीड सुमारास आमच्या शेतातील विहिरीवर बॅटऱ्याचा उजेड दिसला. हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी हॉटेलमधील कामगार कुमार सुखदेव शिंदे याला घेऊन जाऊन बॅटरीच्या उजेडात विहिरीत पाहिले असता एक अनोळखी पुरुष जातीचे प्रेत दिसून आले. बाजूला गुंगेवस्ती, भोसे येथील लोकांनी सांगितले की, विहिरीत पडलेल्या आणखी एका माणसाला गाडीत घालून दवाखान्यात घेऊन गेलेत असेच सांगितले. या घटनेची खबर हॉटेलचे मालक माऊली बंडगर यांनी दिली होती. तर अज्ञात व्यक्तीने शस्त्राने खुन करून भोसे गावच्या हद्दीत प्रेत विहीरीत टाकले अशी.फिर्याद दिलीप सांगोलकर यांनी दिली.

सांगोलकर कुटुंबाचा उदरनिर्वाह हा माणिक वरच चालत असल्याने त्यांच्या मृतूने त्याच्या कुटुंबाचा आधारवड गेल्याने कुटुंबाचा आभाळ कोसळले. आज रड्डेे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास योग्य केेेला जाईल प्रेत ताब्यात घेण्याची विनंती नातेवाईकांना केली.

माणिक सांगोलकर यांच्या मृत्युप्रकरणी पोलिसांनी भोसे येथील दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून याबाबत तपास सुरू आहे.
- मोहन विधाते सहायक पोलीस निरीक्षक

Web Title: Marathi news Solapur news youth murder

टॅग्स