स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत संशोधन व्हावे - जे. एस. सहारिया

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

सोलापूर - आपल्या देशात लोकसभा निवडणुकीविषयी मोठ्या प्रमाणात संशोधन झाले आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्था विषयी संशोधन झाले नाही. हे करण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी केले. सोलापूर विद्यापीठात आयोजित लोकशाही पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन करताना बुधवारी ते बोलत होते.

श्री सहारिया म्हणाले, विद्यापीठ व प्राध्यापक यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना त्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात येत आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. निवडणूकीवेळी उमेदवारांना आपली संपत्ती जाहीर करावी लागते. ही माहिती पोलिंग स्टेशन समोर लावली जाते. तसेच निवडणुकानंतर खर्च किती केला हे सांगावे लागते. 

Web Title: marathi news solapur state election commissioner j s saharia