कर्जाला कंटाळून तरुणाची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

सोलापूर - बजाज फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाला कंटाळून 26 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दाजी पेठ परिसरात सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सागर दिगंबर कोनापूरे (26) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा एका कंपनीत मार्केटींगचे काम करीत होता. बजाज फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाला कंटाळून त्याने सोमवारी सायंकाळी राहत्या घरी पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. त्याला खाली उतरवून वडील दिगंबर कोनापूरे यांनी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्‍टरांनी सागरला मृत घोषीत केले. या घटनेची नोंद जेलरोड पोलिसात झाली असून, पोलिस उपनिरीक्षक विशाल दांडगे तपास करीत आहेत.

Web Title: marathi news solapur suicide