विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने शेतमजुराचा मृत्यु

चंद्रकांत देवकते
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

मोहोळ (सोलापूर) : तालुक्यातील आष्टी येथील तळयातील शेतीला पाणी देण्यासाठी जोडलेल्या विद्युत मोटारी चालू करण्यासाठी गेलेल्या शेत मजुराला विद्युत प्रवाहाचा जोराचा धक्का बसून ते जागीच मयत झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 2) घडली. 

याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून शिवाजी वसुदेव माळी (वय 45) हे शेतमजुर म्हणून काम करतात. आष्टीच्या तळ्याजवळील वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या 70 ते 75 विद्युत मोटारी चालू बंद करण्याचे ते मजुरीवर काम करीत होते. काल ते नेहमी प्रमाणे मोटारी चालू बंद करण्यासाठी गेले असता तेथील एका पेटीजवळ जाऊन मोटार चालू करीत असताना त्यांना विद्युतप्रवाहाचा धक्का बसला. त्यानंतर विद्युतप्रवाह खंडित झाला. दुपारी 4 च्या सुमारास शेजारील 10 ते 15 शेतकरी मोटारी का बंद झाल्या हे पाहयला गेले. त्यावेळी तेथे एका पेटीजवळ शिवाजी हे पडलेले दिसले. त्यांना जाऊन उठविण्याचा प्रयत्न केला असता ते उठले नाहीत. त्यांना विद्युत प्रवाहाचा जोराचा धक्का बसून ते जागीच मयत झाल्याचे दिसले. या बाबत सज्जन वसुदेव माळी यांनी मोहोळ पोलीसात खबर दिली असून अधिक तपास पो. हे. कॉन्स्टेबल सलीम शेख करीत आहेत.

Web Title: Marathi news solpaur news farmer dies due to electric shock