सोलापूर - मरवडे फेस्टिव्हल निमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा

श्रीकांत मेलगे
मंगळवार, 6 मार्च 2018

मरवडे (सोलापूर) : येथील छत्रपती परिवाराच्या वतीने मरवडे फेस्टिव्हल निमित्त प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून यावेळी सकाळचे मुख्य उपसंपादक संजय पाठक, मेजर रमेश शिंदे, प्रा. पी. विठ्ठल, संभाजी यादव, अमित भोरकडे यांना व भारत मासाळ यांच्या कुटूंबियांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती संयोजक सुरेश पवार यांनी दिली.

P Vitthal

Ramesh Shinde

Sambhaji Yadav

Amit Bhorkade

Bharat Masal

विविध पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि.१० मार्च रोजी दुपारी २ वाजून ३०मिनिटांनी मरवडे येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या शुभहस्ते व आमदार भारत भालके यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

मरवडे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी गावाचा नाव लौकिक उंचावणाऱ्या सुपुत्राचा दरवर्षी मरवडेभूषण पुरस्काराने गौरव करण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी सुभेदार मेजर रमेश शिंदे यांची, स्व.ठकूबाई दगडू जाधव श्रावणबाळ पुरस्कारासाठी भारत मासाळ यांच्या कुटूंबाची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर मरवडे फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी साहित्यिक व कलावंतांचा गौरवही करण्यात येतो. यंदाच्या स्व. मुक्ताबाई आप्पा कुंभार साहित्यगौरव पुरस्कारासाठी सोलापूर सकाळचे मुख्य उपसंपादक संजय पाठक यांना 'सुखद काही' या साहित्यकृतीसाठी व नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथील कवी प्रा. पी.विठ्ठल यांना 'एक शुन्य मी' या काव्यसंग्रहासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. कलावंतांना प्रेरणा देण्यासाठी देण्यात येणाऱ्या स्व.भागवतराव पवार कला गौरव पुरस्कारासाठी राधानगरी येथील प्रसिद्ध हास्यकलावंत, प्रबोधनकार संभाजी यादव व मंगळवेढा येथील प्रसिध्द चित्रकार अमित भोरकडे यांची निवड करण्यात आली आहे. 

साहित्यिक व कलावंतांना मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी साहित्य व कलाप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन छत्रपती परिवार व मरवडे ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Marathi news solpaur news marawade festival awards