महावितरणच्या कर्मचाऱ्यांना स्थानिकांची मारहाण

अक्षय गुंड
गुरुवार, 15 मार्च 2018

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : शेतीपंपांचे वीज कनेक्शन सारखेच का बंद करता या कारणांमुळे माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या दोन अभियंत्यांसह, सहा कर्मचाऱ्यांना सरपंचांसह स्थानिकांनी मारहाण केली. यामध्ये सहाय्यक अभियंता पी.एम चव्हाण हे गंभीर जखमी झाले असुन, त्यांना सिव्हिल हॉस्पीटल सोलापूर येथे पुढील उपचार करीता हलविण्यात आले आहे. याप्रकरणी उपळाई बुद्रूकचे सरपंच मनोज गायकवाड यांच्यासह नऊ जणांवर माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार उपळाई बुद्रुकचे सरपंच मनोज गायकवाड यांनी उपकार्यकारी अभियंता आर.पी. चव्हाण यांना उपळाई बुद्रूक येथील लाईट का बंद करता म्हणुन विचारणा केली. त्यानंतर उपकार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण, सहायक अभियंता पी.एम चव्हाण यांच्यासह हरणे, यमलवाड, सलगर, हजारे हे उपळाई बुद्रूक उपकेंद्र येथे गेले असता तेथील उपस्थित शेतकऱ्यांनी इतर ठिकाणची वीज चालु असताना आमची कृषी पंपाची वीज नेहमीच का बंद करता म्हणुन शिवीगाळ करत लाथाबुक्याने व काट्याने अधिकारी कर्मचारी यांना मारहाण केली. या मारहाणीत सहायक अभियंता प्रेमानाथ माणिक चव्हाण हे बेशुद्ध पडले. त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर सिव्हील हाॅस्पिटल येथे हालविण्यात आले आहे.

Web Title: Marathi news solpaur news mseb workers beat by locals