ऊसाचा ट्रक उलटून तीन जण जागीच ठार

सुनील माळगे
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

जळकोट - ऊसाची वाहतूक करणारा ट्रक उलटून तीन जण जागीच ठार झाले. तर सात जण जखमी झाले. जळकोट - नंदगाव रस्त्यावर (ता. तुळजापूर) रविवारी (ता. ११) सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात ठार झालेले तिघेही एकाच कुटुंबातील आहेत. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, नंदगाव शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊसाची तोड करण्यात येत होती. रविवारी या शेतातील ऊसाची तोड पूर्ण झाली. त्यानंतर ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये (एमएच २५ - ८४५७) ऊस भरल्यानंतर त्या ट्रकमध्ये ऊसतोड भरून हा ट्रक धोत्री (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) येथील गोकुळ कारखान्याकडे निघाला होता.

जळकोट - ऊसाची वाहतूक करणारा ट्रक उलटून तीन जण जागीच ठार झाले. तर सात जण जखमी झाले. जळकोट - नंदगाव रस्त्यावर (ता. तुळजापूर) रविवारी (ता. ११) सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात ठार झालेले तिघेही एकाच कुटुंबातील आहेत. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, नंदगाव शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये ऊसाची तोड करण्यात येत होती. रविवारी या शेतातील ऊसाची तोड पूर्ण झाली. त्यानंतर ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये (एमएच २५ - ८४५७) ऊस भरल्यानंतर त्या ट्रकमध्ये ऊसतोड भरून हा ट्रक धोत्री (ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) येथील गोकुळ कारखान्याकडे निघाला होता. नंदगावपासून दोन किलोमीटरवर आल्यानंतर समोरुन येणाऱ्या एका वाहनाला बाजु देताना ऊसाचा ट्रक उलटला. त्यात राजू मिटू राठोड (वय ३५), ललिता राजू राठोड (वय ३०) स्वप्नील राजू राठोड (वय १०, तिघेही रा. रामतीर्थ तांडा, ता. तुळजापूर) हे तिघे जागीच ठार झाले. हे तिघेही एकाच कुटूंबातील आहेत. या अपघातात सात जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जळकोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. अपघाताची माहिती समजताच हंगरगा तांडा येथील ग्रामस्थांनी जखमींना ऊसाच्या ढिगाखालून काढून उपचाराला पाठवण्यासाठी मदत केली. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रामतीर्थ तांडा येथील ग्रामस्थ, नातेवाईकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती.

Web Title: marathi news sugarcane truck accident