विषारी औषध प्राशन करून विवाहितेची आत्महत्या 

हरिभाऊ दिघे 
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

तळेगाव दिघे (नगर) : संगमनेर तालुक्यातील पारेगाव गडाख येथील एका तीस वर्षीय विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करीत आपले जीवन संपवले.

उषा संतोष गडाख (वय 30) असे या दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पारेगाव गडाख येथील विवाहिता उषा संतोष गडाख हिचा नवीन घर बांधण्यासाठी माहेरून चार लाख रुपये आणावेत या मागणीसाठी पती संतोष शिवाजी गडाख हा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. पतीच्या त्रासाला कंटाळून उषा गडाख हिने शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी मयत उषा गडाख हिचा भाऊ विठ्ठल साहेबराव घोटेकर (रा. घोटेकर वाडी ता. सिन्नर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी पती संतोष शिवाजी गडाख याच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस अधिक तपास करीत आहे. रविवारी दुपारी मयत उषा गडाख हिच्या मृतदेहावर पारेगाव गडाख येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Marathi news talegao nagar news married woman suicide