तळेगाव विद्यालयावर 'सीसीटीव्ही'ची नजर! 

हरिभाऊ दिघे
सोमवार, 8 जानेवारी 2018

तळेगाव दिघे (जि. नगर) - विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षितता लक्षात घेता यापुढे महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित तळेगाव दिघे (ता. संगमनेर) येथील न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयावर 'सीसीटीव्ही'ची नजर असणार आहे. याकामी सत्तर हजार रुपये खर्चाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून आठ कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

तळेगाव दिघे विद्यालयात सुमारे दीड हजार विद्यार्थी-विद्यार्थींनी शिक्षण घेतात. विद्यालयात परिसरात टुकार मुलांकडून मुलींची होणारी छेडछाड, त्रास देणे, धूमस्टाईलने दुचाकी चालविणे, चोऱ्या व साहित्याची नासधूस करणे असे संभाव्य प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव जोंधळे, कार्याध्यक्ष दत्तात्रेय जोंधळे यांच्या संकल्पनेतून सत्तर हजार रुपये खर्चून उच्च प्रतीची 'सीसीटीव्ही' यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यालयाचे मैदान, सर्व शाळा खोल्या, विद्यालयाकडे येणारे रस्ते, प्राचार्य दालन, कार्यालय, संगणक प्रयोगशाळा 'सीसीटीव्ही'च्या कक्षेत आले आहेत. यापुढे या विद्यालयावर रात्रंदिवस आठ 'सीसीटीव्ही' कॅमेऱ्यांची नजर असेल. त्यामुळे संभाव्य धोके टळतील, असे प्राचार्य बाळकृष्ण कुटे यांनी सांगितले. 'दक्षतेला प्राधान्य विद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षितता महत्वाची असते. शैक्षणिक गुणवत्तेबरोबर सुरक्षितता महत्वाची असल्याने दक्षता हाच उपाय समजून विद्यालय परिसरात 'सीसीटीव्ही' यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याचे' मत महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दत्तात्रेय जोंधळे यांनी व्यक्त केले.  

Web Title: marathi news talegaon school CCTV camera