टोमॅटोचे भाव गडगडल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल 

हरिभाऊ दिघे
मंगळवार, 13 मार्च 2018

तळेगाव दिघे ( नगर ) - संगमनेर तालुक्यात उत्पादन वाढल्याने टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. भाव गडगडल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल बनले आहेत. गावोगावी जावून शेतकरी आता टोमॅटो विकू लागले आहेत. स्वस्त भावात मिळत असल्याने अनेक शेतकरी जनावरांना चारा म्हणून टोमॅटो खावू घालत आहेत.

तळेगाव दिघे ( नगर ) - संगमनेर तालुक्यात उत्पादन वाढल्याने टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. भाव गडगडल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल बनले आहेत. गावोगावी जावून शेतकरी आता टोमॅटो विकू लागले आहेत. स्वस्त भावात मिळत असल्याने अनेक शेतकरी जनावरांना चारा म्हणून टोमॅटो खावू घालत आहेत.

 टोमॅटो दर कोसळल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो बाजारात नेणे तोट्याचे बनले आहे. त्यामुळे सध्या आपल्या शेतकरी बांधवांनाच अल्प भावात टोमॅटो विकण्यास प्राधान्य देत आहेत. सावरगावतळ ( ता. संगमनेर ) येथील गोरक्षनाथ थिटमे, भाऊसाहेब गाढे, सोमनाथ नेहे, बाबासाहेब थिटमे या शेतकऱ्यांनी सोमवारी पिकअपमधून चिंचोलीगुरव येथे टोमॅटो विक्रीसाठी आणले होते. जनावरांना चारा म्हणुन तज्ञांच्या सल्ल्याने टोमॅटो वापरले जावू शकतात. प्रकाश गोडगे, जगन्नाथ सोनवणे, वाल्मिक गोडगे, संजय सोनवणे, दगडु सोनवणे, तुकाराम सोनवणे, बाळासाहेब शेटे या शेतकऱ्यांनी जनावरांसाठी अल्पदरात टोमॅटो खरेदी केले.

 संगमनेर तालुक्यात यंदा टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. मात्र बाजारात टोमॅटोच्या भावात घसरण झाल्याने टोमॅटो कवडीमोल भावात विकण्याची वेळ उत्पादक शेतकऱ्यांवर आली. पठार भागातील तसेच पाश्चिम भागातील शेतकऱ्यांनी हिवाळ्यात यावर्षी मल्चिंगचा वापर करून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड केली होती. त्यासाठी खते व औषधे यावर मोठा खर्च करावा केला. मात्र उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. 

टोमॅटो खरेदीचे आवाहन 
बाजारात टोमॅटोला ४० ते ५० रुपये प्रति जाळी ( २० किलो ) असा बाजारभाव मिळत आहे. खर्च ३० ते ४० रुपये येत असल्याने शेतकऱ्याला जाळीमागे १० ते २० रुपये शिल्लक राहत नसल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल बनले आहेत. जनावरांसाठी चारा म्हणून शेतकरी बांधवांनी जनावरांसाठी चारा म्हणून टोमॅटो खरेदी करावेत, असे आवाहन राजेंद्र सोनवणे यांनी केले आहे.

Web Title: marathi news tomato farmer sangamner