आजरेकर फडाचे मठाधिपती तुकाराम काळे यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

पंढरपूर - येथील श्री गुरू बाबासाहेब आजरेकर फडाचे मठाधिपती तुकाराम एकनाथ काळे (वय 80) यांचे रविवारी (ता. 28) रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. माघी यात्र असल्याने तुकाराम काळे यांचे काल रात्री कीर्तन झाले. कीर्तनसेवा संपल्यानंतर ते विश्रांतीसाठी खाली बसले. त्या वेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. तुकाराम काळे आजरेकर फडाचे आठवे गुरू होते.

आजरेकर मठाचे यांचे शिष्यगण महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आदी राज्यात मोठ्या संख्येने आहेत. गेल्या तीस वर्षांपासून आजरेकर फडाचे मठाधिपती म्हणून ते काम पाहत होते. संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये आजरेकर फडाला मानाचे स्थान आहे. पालखी सोहळ्यामध्ये चार वेळा कीर्तनसेवा करण्याची परंपरा आहे. सोमवारी दुपारी काळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Web Title: marathi news tukaram kale passed away pandharpur