पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचे झटके

सचिन शिंदे
मंगळवार, 16 जानेवारी 2018

कऱ्हाड - कोयनेसह पश्चिम महाराष्ट्रात दुपारी एक वाजून पाच मिनीटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणाकडे आहे. अंदाजे ३.५ रिश्टर स्केलचा धक्का असावा, असा अंदाज शासकीय सुत्रांनी वर्तविला आहे. त्यामुळे कोणतीही वित्त अथवा जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त पाटण तहसीलदार कार्यालयातून सांगण्यात आले.

भूकंपाची खोली २३ किलोमीटर खोल आहे. धरणापासून १७.३ अक्षांश व ७३.९ रेखांश भूकंपाचा केंद्र बिंदू आहे. भूकंपाचा धक्का पश्चिम महाराष्ट्राला जाणवला आहे. त्याचा केंद्र बिंदू कोयना धरणाकडे दक्षिणेस सुमारे पन्नास किलोमीटरवर आहे, असे भूकंप मापन केंद्रातील शासकीय सुत्रांनी वर्तविले. भूकंपामुळे कोणतीही वित्त अथवा जीवितहानी झालेली नाही, असे कऱ्हाड व पाटण तहसीलदार कार्यालयातून सांगण्यात आले. भूकंपामुळे शासकीय यंत्रणेस अलर्ट राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आले आहेत.

Web Title: marathi news west maharashtra earthquake karhad