सातारा जिल्ह्यात पोस्टाचे काम होणार ऑनलाईन

सचिन शिंदे
मंगळवार, 13 मार्च 2018

जिल्ह्यातील सगळी पोस्ट कार्यालये त्या अर सिस्टीम एन्ट्रीगेशन प्रणालीद्वारे जोडून ती ऑनलाईन होणार आहेत. 

सातारा (कऱ्हाड) - पोस्टाचे कामकाज ऑनलाईन करण्याची प्रक्रीया जिल्ह्यात उद्यापासून (बुधवार, ता. 14) सुरू होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दोन मुख्य पोस्ट ऑफीस, 92 उपशाखा व सुमारे 500 ग्रामीण भागातील शाखांचे कामकाज 19 मार्च अखेर बंद राहणार आहे. पोस्टाच्या कामासाठी कोअर सिस्टीम एन्ट्रीगेशन प्रणाली सुरू होणार आहे. त्याव्दारे जिल्ह्यातील सगळी पोस्ट कार्यालये त्या प्रणालीद्वारे जोडून ती ऑनलाईन होणार आहेत. 

पोस्ट कार्यालयाच्या जिल्ह्यात सुमारे पाचशे वेगवेगळ्या शाखा आहेत. त्यात कऱ्हाड व सातारा येथे दोन मुख्य शाखा आहेत. त्याशिवाय 92 उपशाखा आहेत. ग्रामीण भागात वाडी वस्तीवर मिलून 500 शाखा आहेत. त्या सगळ्याच शाखामध्ये कोअर सिस्टीम एन्ट्रीगेशन प्रणाली सुरू होत आहे. ती प्रणाली अपडेट करण्यासाठी उद्यापासून (ता. 14) सर्वच शाखा बंद टेवण्यात येणार आहे. त्यांचे कामकाज चालू राहणार आहे. मात्र व्यवहार बंद होती. 25 मार्च पर्यंत ती प्रणाली कार्यरत होण्याचा अंदाज आहे. तोपर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्यांना सुट्ट्याही घेता येणार नाहीत. ग्रामीण भागातील शाखामधील कामकाज उद्या सकाळपर्यंत संपवायचे आहे. त्याबाबतचा अहवाल त्यांनी वरिष्ठा द्यावयाचा आहे. उपडाक कार्यालयातील कामकाजाचा शेवटचा दिवस 15 मार्च असणार आहे. त्यादिवशी सगळे काम संपल्याचा अहवाल त्यांनी वरिष्ठ कार्यालयास पाठवून द्यावयाचे आदेश आहेत. प्रधान पोस्ट कार्यालयाच्या कामकाजाचा शेवटा दिवस 16 मार्च आहे. त्याच्या आदल्यादिवशी काम संपल्याचा अहवाल त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना पाठवण्याच्या सुचना आहेत. 

जिल्ह्यातील पोस्ट कार्यालयात कोणतेही व्यवहार एखमकांशी करू नयेत. सर्व डिलीव्हरची कामने वेळेत पूर्ण करम्याचेहा आदेश आहेत. सर्व प्रकारच्या औकोंटचा ताळेबंद तयार करून त्याचा तपशील वरिष्ठांना पाठवायचा आहे. त्यानंतर कोणीही कसलेही व्यवहार न करण्याचे आदेश आहेत. सर्व पोस्ट कार्यालये 20 मार्च रोजी ऑनलाईन जाली पाहिजे, यासाठी त्यांचे व्यवहार बंद ठेवून ती प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याची काळजी प्रत्येक कर्मचार्याने घेवून काळजीपूर्व काम करण्याचेही आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत.

Web Title: marathi news western maharashtra karhad post office new technology online

टॅग्स