कऱ्हाड - मटक्याचा अड्डा चालवणारी टोळी हद्दपार

सचिन शिंदे
गुरुवार, 1 मार्च 2018

कऱ्हाड : शहर व परिसरात निरंतर मटक्याचा अड्डा चालणाऱ्या टोळी प्रमुखासह बावीस जणांना एक वर्षासाठी नऊ तालुक्यांतून हद्दपार केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी काल रात्री आदेश दिले. मटका प्रकरणी दोनच दिवसांपूर्वी चौदा जणांच्या टोळीला हद्दपार केले होते. त्यानंतर दुसरा दणका दिला आहे. पोलिस अधिनियम सन 1951 च्या कलम 55 अन्वये त्यांच्यावर कारवाई केली आहे. त्यांना सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, सातारा, पाटण, खटाव, माण कोरेगाव व सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा व शिराळा तालुक्यात एक वर्ष न येण्याची बंदी आहे. 

संबधितांचे मटक्याचे अड्डे आहेत. त्यांच्यावर वारंवार कारवाई होऊनही मटक्याच्या बुकी बंद करत नसल्याने पोलिस अधीक्षकांनी त्यांना हद्दपार केले आहे. त्यात दुसऱ्या टोळी प्रमुख उमेर मुजानर (वय 30, रा. सोमवार पेठ) याच्यासह बरकत मुजावर (45,  रा. मुजावर काॅलनी), वसंत भोंडे (45), प्रल्हाद माने (44 दोघे रा. चचेगाव) प्रकाश दुपटे (45, रा. कार्वे नाका), मधुकर साळुंखे (50, रा  शिरवडे), रमशाद मलबारी (30, रा. मलकापूर), अनिल वारे (23, रा. बुधवार पेठ) , रमेश सिंदगी (46, रा. बैलबझार रस्ता), समीर शेख (25), वसीम शेख (30), रियाज बुराण (38, तिघे रा. कार्वे नाका), नजीब मलबारी (44), साजीद मलबारी (33, दोघे रा. मलकापूर), गणेश भोसले (30), अनंत कांबळे (24, दोघे रा. बुधवार पेठ) , कामेश नाटेकर (33, मार्केट यार्ड), महींदु मलबारी (56, रा. शनिवार पेठ) , सुनील पवार (51, रा. गोटे), ज्ञानेश्वर माने (34, रा. नांदलापूर), विजय माने (47, रा. सोमवार पेठ), प्रताप कवडे (65, रा. विरवडे) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

तडीपार संबंधित टोळी शहरात बेकायदा मटका जुगार चालवित होती. त्यांच्यावर वेळोवेळी गुन्हे दाखल करून अटक झाली आहे. मात्र तरीही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांच्याकडून सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. तसेच त्यांच्यावर कडक कारवाईसाठी मागणी होत होती. त्यांच्याकडून हिंसक घटना घडण्याची भिती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून या टोळीतील बावीस जणांना हद्दपार केले आहे. 

Web Title: Marathi news western maharashtra news karhad group of speculators expat